तपोभूमी गोंदेडा येथे दिनांक 29 मे रोजी गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांची संकल्प सभेचे आयोजन

31

🔸गुरुदेव भक्तांची लुटमार करून मनमानी विरोधात पुकारला जाणार एल्गार?

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.25मे):-वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज निर्मित अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोझरी तसेच परमपूज्य तुकाराम दादा गीताचार्य यांनी निर्माण केलेल्या आत्मानुसंधान भूवैकुंठ अड्याळ टेकडी, आध्यात्म गुरुकुल मोझरी, ग्रामगीता सक्रिय दर्शन मंदिर पंढरपूर, व इतर संबंधित आश्रमामध्ये राष्ट्रसंतांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानाप्रमाणे व त्यांच्या विचारधारेने कोणत्याही कार्याची गती अत्यंत हळुवार सुरु असून आश्रमातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात पद, सत्ता, स्वार्थ, मान-सन्मान व वर्चस्वा करिता मोठ्या प्रमाणात वाद सुरू आहेत. हानामारी, कोर्टकचेरी व पोलीस स्टेशन पर्यंत वाद पोहचले आहेत. त्यामुळे गुरुदेवाच्या कार्याकडे कोणाचेही लक्ष नाही.

महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने एकाच ठिकाणी दोन दोन पुण्यतिथी काले करून देणगी रूपाने गुरुदेव भक्तांची लुटमार केली जात आहे. पंढरपूर येथील ग्रामगीता तत्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिराच्या नावावर लाखो रुपयांची देणगी वसूल करून प्रचारक हा वसुल केलेली रक्कम समितीच्या खात्यात जमा करित नाही त्यामुळे देणगीदारांचा पैसा सन 2015 पासून ग्रामगीता तत्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिर च्या बॅंक खात्यामध्ये जमा न झाल्याने देणगीदारांच्या नावाची नोंद रेकार्ड ला झालेली नाही. प्रत्येक आश्रमातील प्रमुख पदावर काम करीत असलेल्या व्यक्तींनी लाखो करोडो रुपयाची संपत्ती गुरुदेवाचे नाव समोर करून स्वतःच्या नावाने जमा केलेली आहे. एवढेच नाही तर राष्ट्रसंतांचे गुरुदेव कार्य हे एकच असून सुद्धा अनेकांनी ते ज्या आश्रमात प्रमुख पदावर काम करित आहे ते आश्रम महाराजांच्या अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वेगळे दाखवून स्वतःच्या व कुटुंबाच्या नावाने हडप करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. ढोंगी, स्वार्थी, मतलबी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरुदेव भक्तांची लुटमार करून मनमानी सुरू केलेली आहे.

ज्या लोकांनी कधी गुरुदेव सेवा मंडळात येऊन ध्यान, प्रार्थना केली नाही गुरुदेवाच कुठल कार्य केलं नाही, वा माहित नाही अशा राजकारणी लोकांना गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यामध्ये प्रमुखाचे स्थान दिले जात आहे व राजकारण करित आहे. गुरुदेव कार्याची बिघडलेली घडी दुरुस्त करण्याकरिता ज्या गुरुदेव भक्तांमध्ये तळमळ आहे भ्रष्ट आचरणाची, असत्याची व गैरव्यव्हाराची चिड आहे त्या सर्व सज्जन गुरुदेव भक्तांनी एकत्र येऊन गरुदेव कार्यात सुधारणा करण्याकारिता संकल्प करून संबधिताना समजावण्याची गरज आहे. या संपूर्ण प्रकारावर चिंतन होऊन निर्णायक चर्चा व्हावी या उद्देशाने गोमाता रक्षक, ग्रामगीता तत्वज्ञान सक्रिय आजीवन प्रचारक, निस्वार्थ कर्मयोगी ह.भ.प. श्री गवते महाराज यांचे पावन उपस्थितीत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची तपोभूमी गोंदेडा तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर येथे दिनांक 29/05/2022 रोज रविवार ला दुपारी 12:30 वाजता गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांची संकल्प सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

प्रत्येक गावातील श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रमुख दोन ते पाच सक्रिय पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी स्वयं स्फूर्तीने व स्वखर्चाने सभेला उपस्थित राहण्याकरिता आयोजकांनी विनंती केलेली आहे. असे आयोजक डॉ.येळणे शंकरपूर, सुधाकर पीसे गुरुजी, भुते गुरुजी उमरी, रुपरावजी वाघ, एड.अशोक येवले, नागपूर भैय्याजी बोके वरखेड, हरिश्चन्द्र धोंगडे, गजानन ठाकरे वाघेडा, कैलास भोयर, नागेंद्र चट्टे खडसंगी, सचिन निखाडे, सोनेगाव किशोर गुरले खंडाळा, ठाकरे महाराज यावली, कापसे महाराज, कोटगाव, अरविंद देवतले, कमलताई गुडधे सरडपार, टिकाराम वाघमारे पांढरवानी, रमेश मेश्राम, पुरुषोत्तम शिरभये म्हसली, मनोहर गरमडे, नारायण नन्नावरे मेटेपार, सुमित्राबाई चौखे खांबाडा, मायाताई पिसे नेरी, पवार गुरुजी सावरगाव, संजय ठाकरे, विजय लाडसे, मंगल नन्नावरे विहिरगाव, डोमाजी शिवरकर पळसगाव, मोरेश्वरजी झाडे वाढोणा, गोविंदा मेश्राम सुरबोडी, गोपाल खोडके बाम्हणी, मदन सेडामे तुकूम, आत्माराम भोपे, नितेश वाकडे काग, डार्वीन कोब्रा नागभीड, अरुण सोनवाने दसोडा, सुधीर ठाकरे अकोला, विठ्ठलराव माथुलकर वरोरा, शंकर रासेकर सागरा, सारंग दाभेकर चिमूर यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे.