अग्नीशामक दल व सामाजिक कार्यकर्ते सचिन वैद्य यांनी धाव घेत विझविली आग

✒️देवळी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

देवळी(दि.25मे):-स्थानिक देवळी शहरातील चंद्रकौशल्य तडस सभागृह समोरील काकडे यांच्या खुल्या असलेल्या जागेत आज दि.24/05/2022 रोजी सकाळी 11 वाजता अज्ञात इसमाने आग लावली होती त्या मोकळ्या जागेत केर, कचरा, सुकलेली झाडेझुडपे इतरत्र पसरलेली आहेत ती आग वाढत सर्व आजूबाजूचा परिसर आगीने वेढला असता परंतु सामाजिक कार्यकर्ते सचिन वैद्य यांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न करीत नगर परिषद कर्मचारी सुनील खोंड यांना आगीची दूरध्वनीद्वारे माहिती कळविली असता त्यांनी शनाचा विलंब न करता घटनास्थळी अग्निशामक दल पाठविले अग्नीशामक दलांनी वेळीच दाखल होऊन आग आटोक्यात आणत पुढील अनर्थ टाळला व सुदैवाने त्यामध्ये कुठलेही नुकसान झाले नाहीत यामध्ये अग्निशामक वाहन चालक अक्षय क्षीरसागर , रणजित दाबेकर फायरमन, शेख अकील फारूकी , श्रावण पारिसे , अथर्व नरड , सचिन वैद्य व इतर नागरिकांनी सहकार्य केले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED