रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई करून ज्यादा दराने खत विकणाऱ्या दुकानदारावर कारवाई करावी: पंडित साळुंके जिल्हा समन्वयक

24

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल,प्रतिनिधी)मो:-9922358308

कुरुल(दि.25मे):-प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटना माढा यांच्या वतीने लोकरे साहेब यांना निवेदन रासायनिक खतांची साठेबाजी करणाऱ्या, शेतकऱ्यांना वाढीव दराने खत विकणाऱ्या आणि शेतकऱ्यांना गरज नसणाऱ्या खतांची बळजबरी करणाऱ्या खत दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी प्रहार शेतकरी संघटना माढा तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांची जर पिळवणूक केली अथवा तक्रार आली तर प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दत्ता भाऊ मस्के, जिल्हा समन्वयक पंडित साळुंके यांच्या नेतृत्त्वाखाली हलगी नाद आंदोलन करण्याचा इशारा प्रहार शेतकरी संघटनेचे माढा तालुका अध्यक्ष अमोल केसरे यांनी दिला आहे. त्याप्रसंगी जिल्हा समन्वयक पंडित साळुंके, तालुका अध्यक्ष अमोल केसरे संतोष कोळी, अनिल सोनार सर, आतर सर, माळी सर, तालुका उपाध्यक्ष भास्कर पाटील असे अनेक पदाधिकारी उपस्थित होते .*