पावसाळा सुरू होण्यापूर्वी बीड शहरातील सर्व भागातील नालेसफाई व रस्त्यांची डागडुजी करावी: वंचित बहुजन आघाडी

✒️बीड प्रतिनिधी(समाधान गायकवाड)

बीड(दि.२६मे):-वंचित बहुजन आघाडी बीड पश्चिम च्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले की पावसाळ्यापूर्वी बीड शहरातील सर्व भागातील नालेसफाई तसेच शहरांतर्गत सर्व रस्त्यांची डागडुजी लवकरात लवकर करण्यात यावी तसेच बीड शहरांतर्गत जे छोटे मोठे ओढे आहेत त्या ओढयांची साफसफाई होणे गरजेचे आहे.

बीड शहरातील सर्व भागातील नाल्यांची साफसफाई केल्याने पावसाचे पाणी सोयीस्करपणे वाहून जाईल त्या पाण्याचा नागरिकांच्या आरोग्याला कसलाही धोका होणार नाही तसेच साथीचे आजार पसरणार नाहीत तसेच बीड शहर अंतर्गत येणाऱ्या खराब रस्त्यांची डागडुजी करण्यात यावी कारण रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पावसाळ्यात पाणी साचून अपघात होण्याची दाट शक्यता असते बीड शहरातील नागरिकांना पावसाळ्यात नालीच्या दुर्गंधीपासून तसेच रस्त्यावर पाणी साचून होणाऱ्या अपघातापासून नागरिकांचे रक्षण करावे यासाठी वंचित बहुजन आघाडी बीड पश्चिम च्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना वंचित आघाडीचे जिल्हा महासचिव ज्ञानेश्वर कवठेकर जिल्हा सहसचिव युनूस शेख जिल्हा सदस्य अजय सरवदे युवा नेते संदीप जाधव उमेश तुळवे आदी उपस्थित होते

बीड, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED