ब्रम्हपुरी तालुक्यातील नदी घाटातून अवैध वाळू तस्करांची गगन भरारी- प्रशासनाची संशयास्पद भूमिका

29

🔸महसूल विभागाचा लाखोचा महसूल जमीनदोस्त

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.26मे):-तालुक्यातील वाळू तस्करीला ऊत आला आहे. पोखरून वाळू माफिया तालुक्यात सक्रिय झाले असून, अनेकांनी वाळू तस्करीतून कमी कालावधीत मोठी माया गोळा केल्याची माहिती आहे.महसूल विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून वाळू माफियानी तालुक्यातील नदी पोखरून काढली आहे.तालुक्यातील पाच सहा गावातील नदी घाटातून मोठ्या प्रमाणातवाळु तस्करी सुरू असून, तालुका महसूल प्रशासनाची भूमिका संशयास्पद दिसून येत आहे.

तालुक्यातील अर्हेर-नवरगाव, भालेश्वर, आवळगाव, रनमोचन,कोल्लारी, सोनेगाव ई. ठिकाणी रेतीघाट आहे. या घाटातून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी केल्या जाते. यासाठी परिसरातील रेती तस्कर जोमाने भिडले आहेत.वैनगंगा नदी पात्रातील वाळू चमकदार , पांढरी शुभ्र व घराच्या कामासाठी सोहिष्कर असल्याने ब्रम्हपुरी तालुक्यातील वाळूची मोठ्या प्रमाणात मागणी नागरिकांकडून केली जात आहे. वाळू मागणीचा फायदा घेत वाळूचे भाव गगनाला भिडले आहेत. यात घरकुल लाभार्थ्यांना वाळू मोजक्या भावात न मिळता जास्तची रक्कम मोजावी लागत आहे. हे सर्व परिस्थिती बघता संबधित अधिकाऱ्यांनी वाळू माफियावर ताबडतोब आळा घालावा असे नागरिकांकडून बोलले जात आहे.