आंतरविद्याशाखीय मंडळाची स्थापना तातडीने करा – प्रा. धोंडगे

55

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि 26मे):-डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत आंतरविद्याशाखीय मंडळाची स्थापना तातडीने करावी, अशी मागणी विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्रा. डॉ. एम. बी. धोंडगे यांनी केली आहे. पेट परीक्षा ऊत्तीर्ण होवूनही अनेक विषयांतील विद्यार्थ्यांना संशोधक मार्गदर्शक मिळत नसल्याने या मंडळाची गरज असल्याचे प्रा. धोंडगे यांनी म्हटले आहे.पेट २०२१ मध्ये वृत्तपत्रविद्या, फाईन आर्ट, नाट्यशास्त्र, संगीत आदि विषयांमध्ये अनेक विद्यार्थी ऊत्तीर्ण झाले आहेत. परंतू या विषयांतील मार्गदर्शकांची संख्या अपूरी असल्याने अनेक पात्र विद्यार्थ्यांना अद्यापही मार्गदर्शक मिळू शकलेले नाहीत.

ही बाब ७ मार्च २०२२ रोजी झालेल्या अधिसभा बैठकीत चर्चीली जावून अशा विद्यार्थ्यांवर अन्याय होवू नये यासाठी आंतरविद्याशाखीय मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतू यावर अद्यापही ठोस कारवाई झालेली नाही. या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करून आंतरविद्याशाखीय मंडळाची स्थापना तातडीने करावी, अशी मागणी प्रा. डॉ. एम. बी. धोंडगे यांनी केली आहे.मंडळ आवश्यक – प्रा. डॉ. करपे व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रा डॉ राजेश करपे यांनीही ही मागणी लावून धरली असून पात्र विद्यर्थ्यांना संशोधक मार्गदर्शक मिळणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शक मिळावेत यासाठी आंतरविद्याशाखीय मंडळाची स्थापना करून संशोधक विद्यार्थ्यांची गैरसोय दूर केली जाईल, असा विश्वास प्रा. डॉ. राजेश करपे यांनी व्यक्त केला आहे.