मोर्शी वरुड तालुक्यात अभ्यासिकेसाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर !

139

🔸आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नातून अभ्यासिका निर्माण होणार !

🔹मोर्शी वरुड तालुक्यातील युवकांनी मानले आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार !

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.26मे):- विधानसभा मतदार संघातील ग्रामीण व नागरी वस्तीचा विकास करण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत मोर्शी वरुड तालुक्यातील विविध गावांमध्ये अभ्यासिका निर्माण करण्यासाठी १ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली आहे.ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांच्या, गावांचा विकास करण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी पुढाकार घेतला असून आमदार देवेंद्र भुयार यांनी सुचविलेल्या कामांना शासनस्तरावरून मान्यता मिळाली असून मोर्शी वरुड तालुक्यातील रिद्धपुर, अंबाडा, हिवरखेड, लोणी, बेनोडा, जरूड या गावांमध्ये अभ्यासिकेचे बांधकाम करणे व अभ्यासिकेसाठी फर्निचर, संगणक, त्या संबंधित आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयी सुविधायुक्त अभ्यासिका निर्माण होणार आहे.

अभ्यासिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परिक्षांबाबत गोडी निर्माण करण्याचे काम व्हावे यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे सुचविलेल्या कामांना “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने” अंतर्गत सण २०२१ – २२ या वर्षासाठी मोर्शी वरुड तालुक्यातील विकास कामांना शासनस्तरावरून प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याची मागणी करण्यात आली होती.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दखल घेऊन मोर्शी वरुड तालुक्यातील रिद्धपुर येथे अभ्यासिकेचे बांधकाम करणे करीता १० लक्ष रुपये, अभ्यासिकेसाठी फर्निचर, संगणक, त्या संबंधित आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी ५ लक्ष रुपये, अंबाडा येथे अभ्यासिकेचे बांधकाम करणे करीता १० लक्ष रुपये, अभ्यासिकेसाठी फर्निचर, संगणक, त्या संबंधित आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी ५ लक्ष रुपये, हिवरखेड येथे अभ्यासिकेचे बांधकाम करणे करीता १० लक्ष रुपये, अभ्यासिकेसाठी फर्निचर, संगणक, त्या संबंधित आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी ५ लक्ष रुपये, लोणी येथे अभ्यासिकेचे बांधकाम करणे करीता १० लक्ष रुपये, अभ्यासिकेसाठी फर्निचर, संगणक, त्या संबंधित आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी ५ लक्ष रुपये, जरूड येथे अभ्यासिकेचे बांधकाम करणे करीता १० लक्ष रुपये, अभ्यासिकेसाठी फर्निचर, संगणक, त्या संबंधित आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी ५ लक्ष रुपये, पुसला येथे अभ्यासिकेचे बांधकाम करणे करीता १० लक्ष रुपये मंजूर करण्यात आले असून या गावातील अभ्यासिका पूर्ण करण्यासाठी १ कोटी रुपयांच्या विकास कामांना ३१ मार्च रोजी मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.

आमदार देवेंद्र भुयार यांच्या विशेष प्रयत्नातून ग्रामीण भागात अद्ययावत अभ्यासिका उभारल्या जाणार असल्यामुळे आदर्शवत काम समाजापढे उभे राहणार आहे. या अभ्यासिकेच्या माध्यमातून मोर्शी वरुड तालुक्यातील व परिसरातील युवकांना स्पर्धा परीक्षा तसेच विविध क्षेत्रात करिअर करण्याची संधी मिळणार आहे. निर्माण होणाऱ्या अभ्यासिका एकप्रकारे युवकांना प्रेरणा देणाऱ्या ठरणार असून, यामधून चांगले विद्यार्थी घडतील, असा आशावाद आमदार देवेंद्र भुयार यांनी व्यक्त असून मोर्शी वरुड तालुक्यातील युवकांनी मानले आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार मानले.