बहुजन समाजाचा आवाज विवेक कुचेकर यांना राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्कार जाहीर

31

✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)

बीड(दि.27मे):-गोरगरिब, वंचित, ऊसतोड मजुर,कष्टकरी, शेतकरी, बहुजन समाजासाठी अविरत आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवणारे बीड जिल्हयातील चौसाळा या गावचे भुमिपुञ विवेक(बाबा)कुचेकर यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेवून मुबंई येथिल प्रसिद्ध दैनिक लोकांकित चे संपादक संजय पवार व त्यांच्या टीमने आयोजित केलेल्या “राज्यस्तरीय समाजभुषण
सोहळ्यासाठी बहुजन समाजाचा आवाज विवेक कुचेकर यांना यंदाचा समाजभुषण पुरस्कार जाहीर केला आहे.

विवेक कुचेकर हे महाराष्ट्राच्या बीड सारख्या जिल्हयामध्ये चौसाळा या ग्रामीण भागामध्ये राहत असुन ते वेळोवेळी गोरगरीब सर्वसामान्य वंचित लोकांची सेवा करतात त्यांना बाबा या नावाने पुर्ण जिल्हा भर ओळखल जाते .विवेक कुचेकर हे गेल्या कित्येक वर्षांपासून सामाजिक, राजकिय व पञकारिता क्षेञामध्ये उत्तुंग अशा पध्दतीचे व्यक्तीमत्तव आहे.सामाजिक कार्यामध्ये सतत मदतीची भावना ठेवणारे विवेक(बाबा)कुचेकर हे त्यांचा जन्मदिवस अनाथक्ष्रमात साजरा करतात.गोरगरिबांना अन्नदान करून विविध सन ,महापुरूषांच्या जयंत्या साजरया करतात. धरणीमातेची सेवा म्हणून सतत वृक्ष लागवड,विद्यार्थ्यांना खाऊ फळे,वाटप करून आणी अनाथ बालकांना महापुरूषांच्या जयंतीचे औचित्य साधुन दरवर्षी पन्नास विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेतात.कोरोना सारख्या महामारीमध्ये मोफत राशन,किराणा,अनाथाना अन्नदान व गरजवंत लोकांना येण्याजाणयासाठी गाडी खर्च देखील त्यांनी दिला होता.

विवेक(बाबा)कुचेकर हे सामाजिक व राजकीय व्यक्तिमत्व असल्याकारणामुळे त्यांनी विद्यार्थ्यी ,शेतकरी, कष्टकरी, शेतकरी, ऊसतोड मजुर, व सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी शासन दरबारी विविध आंदोलन,रास्तारोको,निवेदने,आणी उपोषणे केली आहेत .आंदोलनाच्या माध्यामातुन अनेक लोकांचे प्रश्न सोडविले आहेत.शिव, फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील नामवंत युवा कार्यकर्ता म्हणुन त्यांच्याकडे पाहीले जाते सर्वसामान्य जनता त्यांना बाबा या नावाने ओळखत आहे.या सर्व कामाचा आढावा घेऊन दैनिक लोकांकितचे मुख्य संपादक संजय पवार सर यांनी व त्यांच्या टीमने विवेक (बाबा)कुचेकर यांना मानाचा सामाजिक कार्यातला राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्कार जाहीर केला आहे.या पुरस्काराचे वितरण मुबंई (पनवेल)येथील नांमाकित होटॅल रेडविंग कॅस्टल येथे दिनांक २९ मे २०२२ रोजी मोठया थाटात संपन्न होणार असुन या निवडीबद्दल समाजातुन सर्वच स्तरातुन विवेक कुचेकर यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.