खर्डीतून विठ्ठलची”मोट बांधली जातेय!

27

✒️खर्डी प्रतिनिधी(अमोल कुलकर्णी)

खर्डी(दि.27मे):-राज्यातील सहकारात ज्यांनी कार्याचा डोंगर उभा केला अशा स्वर्गीय सुधाकर परिचारक यांच्याच गावातून विठ्ठल कारखान्याची मोट बांधण्याचा चंग अभिजित पाटील यांनी बांधल्याचे दिसून आले.एकीकडे बी.पी.रोंगे एकदा पराभव पचवून आता पुन्हा निवडणूक लढविण्याचा हालचाली करत आहेत तर परिचारकच दामाजी मध्ये व्यस्त आहेत.अशातच भर उन्हात अभिजित पाटील यांनी खर्डीतील विठ्ठलच्या सभासदांच्या घरी भेटी देण्यास सुरुवात केली.जे विठ्ठल परिवार म्हणून कार्य करतात असे भालके गटाचे कार्यकर्त्यांच्या दारी 4 कारखाने सक्षमपणे चालवणारा नेता आला तर नक्कीच सदस्य विचार करणारच.

येणाऱ्या निवडणूकीसाठी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची प्रारुप मतदार यादी घेऊन भेटी देण्याच्या निमीत्ताने अभिजित पाटील यांनी सभासदांच्या दारी जाऊन चक्क साखर शाळा घेतली.एकीकडे कुशल नेतृत्व परिचारक आणि दुसरीकडे भारत भालके यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न अभिजित पाटील यांनी पहिल्याच भेटीत करून दाखवला.दिनांक १७मे२०२२ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली असून, कुठल्याही क्षणी एकेकाळी राज्यातील वैभवसंपन्न असणाऱ्या विठ्ठल कारखान्याची निवडणूक प्रक्रिया जाहीर होऊ शकते.

त्या अनुषंगाने गावभेट दौरे सुरू केले असल्याची माहिती ऍड संजय रोंगे यांनी दिली. त्यावेळी सभासदांनी सक्षम पणे कारखाना चालवणाऱ्या व्यक्तीच्या हातात विठ्ठलाची सत्ता द्यावयाची आहे असं सर्वानुमते निर्णय घेतला असून भविष्यामध्ये बंद पडलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला पूर्वीचे गतवैभव प्राप्त करून द्यावयाचे असेल तर अभिजितआबां सारख्या योग्य व्यक्तीच्या हातात विठ्ठलची सत्ता दिल्याशिवाय कारखाना पूर्वपदावर येणार नाही अशी भावना सभासदांमध्ये व्यक्त होत आहे.