पत्रकारांसाठी मोफत कार्यशाळा

✒️अकलूज(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अकलूज(ता.27मे): -प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, सोलापूर जिल्हा यांचे वतीने पत्रकारांचा स्नेहमेळावा व एक दिवसीय मोफत कार्यशाळा रविवार दिनांक 29 मे 2022 रोजी नगर परिषद हॉल, अकलूज जिल्हा सोलापूर येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ खंडागळे यांनी दिली.

अकलूज नगर परिषदेच्या हॉलमध्ये घेण्यात येणाऱ्या या कार्यक्रमात सकाळी 10.00 ते 10.30  नाव नोंदणी चहापान व शुभारंभ त्यानंतर 10.30 ते 12.00 ‘भाषिक व्यवहार आणि पत्रकारिता’ याविषयी अरविंद जोशी यांचे व्याख्यान, दुपारी  1ं.00 ते  2.30 ”पत्रकारितेची आचारसंहिता’ या विषयी डी. टी. आंबेगावे यांचे व्याख्यान, 2.30  ते 3.00 :  खुली चर्चा, 3.00 ते 4.00 : समारोप असा कार्यक्रम होणार असून कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही मात्र इच्छूकांनी शनिवार दि. 28 मे 2022 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत 8600270199 या मोबाईल नंबरवर नाव नोंदणी करणे आवश्यक असल्याचे श्री खंडागळे यांनी सांगितले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED