सेवानिवृत्त् शिक्षकांना पेंशन, गटविमा, भ. नि. नि. चे लाभ त्वरीत प्रदान करा -महा.पुरोगामी शिक्षक समितीची मागणी

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.27मे):-जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत सेवानिवृत्त् शिक्षकांचे अनेक समस्या प्रलंबित असून सेवानिवृत्त् शिक्षकांचे समस्यासदंर्भात लक्ष वेधण्यासाठी संघटनेचे वतीने दिनांक 26/5/2022 ला मुख्य कार्यकारी अधिकारी /मान.शिक्षणाधिकारी (प्राथ) यांना निवेदन देण्यात आलेले आहे. संबंधित सेवानिवृत्त् शिक्षकांना सेवेतून निवृत्त् होवून 5-6 महिन्यापेक्षा अधिकचा अवधी झालेला आहे. परंतू त्यांना त्यांच्या हक्काची जमा केलेली रक्कम आजमितीस अप्राप्त् आहे. करिता संबंधित सेवानिवृत्त् शिक्षकांना त्यांची पेंशन, गटविमा, भ.नि.नि. व इतर लाभाची रक्कम त्वरीत मिळणेसाठी मान.सुधीरभाउु मुनगंटीवार, अध्यक्ष लोकलेखा समिती म.रा. तथा आमदार बल्लारपूर विधानसभा, माजी कॅबीनेट मंत्री म.रा.यांना निवेदन देण्यात आले आहे.

श्री. हरिश्चंद्र महादेव कामडी स.शि.पं.स.चिमुर दिनांक 30/ 09/ 2021 ला सेवानिवृत्त् झाले असून त्यांना आजमितीस कोणताही लाभ मिळालेला नाही. श्री. पुष्पांकर बांगरे, से. नि. शिक्षक पं.स.ब्रम्हपुरी हे दिनांक 31/01/2022 ला सेवानिवृत्त् झाले. त्यांना सेवानिवृत्त् उपदान, अंशराशीकरण, भ. नि. नि. अंतिम परतावा लाभ मिळालेला नाही. श्री.सुधीर निलकंठ आमले, श्री. बी. बी.उंबरकर, श्री. दिलीप कामडी पं.स.नागभीड यांना गटविमा लाभाची रक्कम मिळालेली नाही .

कै.गजानन नागपूरे, उ.श्रे.मु.डोंगरगांव पं.स. राजुरा हे दिनांक 15 एप्रिल 2017 ला कार्यरत असतांना मयत झाले. 4 वर्षानंतरही गटविमा प्रस्ताव मंजुर न झाल्याने गटविम्याची रक्कम अप्राप्त् आहे. श्री. गजेंद्र वसंतराव गोडे चरुर खटी पं.स.वरोरा मयत दि. 7/11/2021 यांचे GPF ,GIS व ग्रुज्युएटी मंजुर झालेली नसल्याने ते सदर लाभापासून वंचित आहेत. सर्व सेवानिवृत्त् शिक्षकांना त्यांचे हक्काचे लाभ मिळावे यासाठी मान. सुधीरभाउु मुनगंटीवार अध्यक्ष लोकलेखा समिती म.रा.तथा आमदार बल्लारपूर विधानसभा तसेच मान.मिताली शेटटी मुख्य कार्यकारी अधिकारी व मान. शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद चंद्रपूर यांना एका निवेदनादवारे मागणी महा.पुरोगामी शिक्षक समितीचे राज्यनेते विजय भोगेकर, राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, राज्याध्यक्ष महिला मंच अल्का ठाकरे, जिल्हा प्रमुख सल्लागार दिपक व-हेकर, जिल्हा नेता नारायण कांबळे, जिल्हाध्यक्ष किशोर आनंदवार,जिल्हा सरचिटणीस संजय चिडे, जिल्हा कार्याध्यक्ष गंगाधर बोढे, जिल्हा कोषाध्यक्ष सुनिल कोहपरे, कार्यालयीन सचिव सुरेश गिलोरकर जिल्हा उपाध्यक्ष मोरेश्वर बोंडे,रवि सोयाम,सुधाकर कन्नाके,लोमेश येलमुले,जिल्हा नेता महिला मंच सुनिता इटनकर,महिला मंच अध्यक्ष विद्या खटी, महिला मंच सरचिटणीस पौर्णिमा मेहरकुरे,महिला मंच कार्याध्यक्ष सिंधु गोवर्धन,महिला मंच कोषाध्यक्ष लता मडावी, महिला मंच उपाध्यक्ष पुनम सोरते, सुलक्षणा क्षिरसागर,सहसचिव दुष्यंत मत्ते, प्रमुख संघटक नरेश बोरीकर, महिला मंच प्रमुख संघटक ज्ञानदेवी वानखेडे यांनी केलेली आहे असे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख लक्ष्मण खोब्रागडे एका पत्रकान्वये कळविले आहे.

चंद्रपूर, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED