शासकीय रक्तपेढ्यामध्ये रक्ताची टंचाई बघता येत्या शनिवार ला रक्तदाताने प्रा.आ.केंद्र.जिवती येथे येऊन रक्तदान करावे

26

🔸रुग्णसेवक जिवन तोगरे यांचे आव्हान

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.27मे):- रक्तसाठा कमी असल्याने रुग्णाची गैरसोय होत आहे. उन्हाळा सुरू असल्याने रक्तदात्यांची संख्या कमी भासत आहे, म्हणून सामाजिक बांधिलकी म्हणून आपण राजकीय पक्ष, विविध सेवाभावी संघटना, सामाजिक संघटना,युवा संघटना, शैक्षणिक संघटना तसेच इच्छुक रक्तदात्यानी होणा-या रक्तदान शिबिरात आपला सहभाग नोंदवून जास्तीत जास्त रक्तदान करण्यास लोकांना प्रेरित करुन रुग्णाची प्राण वाचवावे. त्यामुळे नियमित गंभीर रूग्णांना रक्त पुरवठा करणे शक्य होईल. कारण रक्ताची मागणी खुप वाढली असल्यामुळे ब्लड बँकमध्ये रक्त साठा कमी दिसुन येत आहे. रक्तदात्यांची संख्या कमी उन्हाळा असल्यामुळे खूप कमी दिसत आहेत.असल्यामुळे ब्लड बँकमध्ये दिवसेंदिवस रक्ताचा तुटवडा भासत आहे.

वेळीच रक्त न मिळाल्यामुळे अनेक रूग्णांना आपल जीव देखील गमवावा लागतो.हे सर्व परिस्थिती बघता प्रा.आ.केंद्र जिवती यांच्या नेतृत्वाखाली भव्य रक्तदान शिबिर दिनांक २८/०५/२०२२ रोजी आयोजित करण्यात आले आहे सामाजिक भान राखून रक्तदान करण्यासाठी रक्तदाताने पुढे या आणि ह्या परिस्थितीत समतोल राखण्यासाठी आपले अमूल्य योगदान द्या असे आव्हान रुग्णसेवक जिवन तोगरे यांनी जिवती तालुका सर्व रक्तदाताना समोर येऊन येत्या २८/०५/२०२२ ला, प्रा. आ. केंद्र जिवती येथे होत असलेल्या रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन सहकार्य करावे असे आव्हान प्रहार संघटनेचे रूग्णसेवक जिवन तोगरे यांनी केले आहे.