एसीसी कंपनीच्या नॉट फॉर रिसेल सिमेंट बैगा चोरणाऱ्या राजू रेड्डीवर गुन्हे दाखल करा

49

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.27मे):-कंपनीचे अधिकारी मुख्य व्यवस्थापक अनिल गुप्ता. मुख्य सुरक्षा अधिकारी जोगिंदर सिंह, पर्सनल मैनेजर पुष्कर चौधरी व सिव्हिल इंजिनिअर विवेक शर्मा यांच्यावर सुद्धा सिमेंट चोरीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी कंपनी व्यवस्थापन हादरले ?

चंद्रपूर जिल्ह्य़ातील घुग्गुस नकोडा येथील एसीसी सिमेंट कंपनीच्या नॉट फॉर सेल सिमेंट च्या बैगा घुग्गुस येथील एका खाजगी घर बांधकामाकरिता वापरत असल्याची माहिती समोर आल्यानंतर दिनांक 5/ 12/2018 ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन देऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर घुग्गुस पोलीस स्टेशन येथे एसीसी सिमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून जप्त केलेल्या सिमेंट बैगा ह्याची शहानिशा करायलालावली दरम्यान कापणीच्या अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशन मधे तक्रार दिल्यानंतर जवळपास तीन कंत्राटदारावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यात एस राज या कंत्राटी कंपनीचे कंत्राटदार राजू रेड्डी यांना या प्रकरणी अटक झाली होती आता परत त्याच राजू रेड्डी यांच्या “एस राज” चा शिक्का असलेल्या नॉट फॉर रिसेल सिमेंट बैगा कोसारा येथे सापडल्या व त्या रामनगर पोलीस स्टेशन मधे जप्त करण्यात आल्या आहे.

या घटनेचा पोलीस तपास सुरू आहे मात्र एसीसी कंपनीचे अधिकारी हे याबद्दल कुठलीही माहिती देत नसून त्यात सामील असलेल्या कंपनीचे अधिकारी व कंत्राटदार राजू रेड्डी यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने त्वरीत एस राज चे संचालक राजू रेड्डी यांच्यासह या सिमेंट बैगा चोरी प्रकरणात सामील कंपनीचे अधिकारी मुख्य व्यवस्थापक अनिल गुप्ता. मुख्य सुरक्षा अधिकारी जोगिंदर सिंह, पर्सनल मैनेजर पुष्कर चौधरी व सिव्हिल इंजिनिअर विवेक शर्मा यांच्यावर सुद्धा सिमेंट चोरीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.

मागील साडेतीन वर्षांपूर्वी 200 नॉट फॉर सेल सिमेंट च्या बैगा घुग्गुस पोलिसांनी जप्त केल्या होत्या त्यावेळी त्या 200/- रुपये प्रती दराने कलीम नावाच्या एका खाजगी बांधकाम करणाऱ्या व्यक्तीने कंपनीचे कंत्राटदार राजू रेड्डी यांच्याकडून विकत घेतल्या होत्या त्यामुळे कंत्राटदार राजू रेड्डी यांच्यावर सिमेंट चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली होती शिवाय खुल्या बाजारात सिमेंट विकल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने या प्रकरणाची तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सिआयडी चौकशी सुद्धा मनसे च्या मागणीमुळे करण्यात आली होती. त्या घतनेला आता साडेतीन वर्ष पूर्ण होत असताना आता परत त्या घटनेची पुनरावृत्ती झाली असून रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कोसारा या गावाशेजारी असलेल्या एका खाजगी प्लॉट वर अंदाजे जवळपास 20 ते 22 नॉट फॉर रिसेल च्या सिमेंट बैगा बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी सापडल्या आहेत व रामनगर पोलिसांनी त्या जप्त पण केल्या आहे.

या संदर्भात मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी दिनांक 19/5/2022 ला रामनगर पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांच्याशी पर्यावरण नेते राजेश बेले व इतर मनसे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन चर्चा केली व त्यांनी म्हटल्याप्रमाणे कुकडे यांनी रामनगर पोलीस स्टेशन मधे तक्रार सुद्धा केली. अजूनपर्यंत पोलिसांचा तपास सुरू आहेत पण ज्याअर्थी त्या नॉट फॉर रिसेल सिमेंट बैगा वर “एस राज” या कंत्राटी कंपनीचा शिक्का आहे व त्याचे प्रमुख राजू रेड्डी यांच्यावर अगोदरच सिमेंट चोरीचे गुन्हे दाखल आहे तर मग त्यांच्यावर गुन्हा कां दाखल करण्यात आला नाही ?असा सवाल करून यामध्ये कंपनीच्या काही अधिकाऱ्यांचा सुद्धा या नॉट फॉर रिसेल च्या सिमेंट बैगा चोरीत हात असल्याने ते परस्पर हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याने या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन दोषी कंत्राटी कंपनीचे कंत्राटदार राजू रेड्डी यांच्यासह कंपनीच्या अधिकारी मुख्य व्यवस्थापक अनिल गुप्ता. मुख्य सुरक्षा अधिकारी जोगिंदर सिंह, पर्सनल मैनेजर पुष्कर चौधरी व सिव्हिल इंजिनिअर विवेक शर्मा यांच्यावर सुद्धा सिमेंट चोरीचे गुन्हे दाखल करावे व सार्वजनिक मालमत्तेचा सर्हासपने दुरुपयोग होत असल्याने यावर कायम प्रतिबंध लावण्यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई करावी अन्यथा सार्वजनीक हिताचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा सुद्धा मनसे तर्फे दिलेल्या तक्रारीत राजू कुकडे यांनी दिला आहे