मातुलठाण येथे मोफत नेत्र चिकित्सा शिबीर संपन्न

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी,येवला)मो:-९६०४१६२७४०

येवला(दि.28मे):- बाबासाहेब डमाळे पाटील मित्र मंडळा तर्फे येवला तालुक्यातील मातुलठाण येथे मोफत नेत्र तपासणी शिबीरआयोजित करण्यात आले होते.याचे उद्घघाटन सरपंच विलासराव नागरे,सोपानराव सुराशे, लक्ष्मणभाऊ सुराशे यांचे हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी मच्छिंद्र जाधव, रघुनाथ आहेर, बबन बांगर, कौतिक सुराशे,वाल्मीक ऊगले,सुनील सुरासे, रघुनाथ आहेर,बाबासाहेब नागरे, वाल्मीक उगले, कचरू गरुड, सुनील सुराशे, दीपक उगले, मधुकर गरुड, प्रवीण केदार,रामभाऊ ऊगले,दशरथ शिंगाडे,ऊतम आहेर,सतीश नांगरे सह मान्यवर उपस्थित होते. डॉ.राजूखान सय्यद यांच्या माध्यमातून डॉ.अखीलेश रजपुत, डॉ.अजित यादव यांनी वेळी महिला-पुरुष यांची नेत्र तपासणी केली. नेत्र रुग्णांनाच्या पुणे येथे एच.व्ही.देसाई हॉस्पिटल येथे मोफत शस्त्रक्रिया बाबासाहेब डमाळे पाटील मित्र मंडळा मार्फत करण्यात येणार आहे.अशी माहीती रोहन डमाळे यांनी दिली.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED