बुक्स कार्ट तर्फे पुण्यामध्ये 26 ते 29 मे दरम्यान पुणे बुक फेअर चे आयोजन

✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)

पुणे(दि.28मे):- पुण्यामध्ये बुक्स कार्ट तर्फे 26 ते 29 मे दरम्यान पुणे बुक फेअर चे आयोजन पुण्यातील वाकडेवाडी येथील राज योग बँक्वेट हॉल येथे करण्यात आले आहे. या बुक फेअर चे उद्घाटन बुक्स कार्टचे मालक म्हांतेश ,संगीता पिंगळे, वनिता भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. या बुक फेअरमध्ये पुस्तकांचे प्रदर्शन , वाचन विक्री व अदलाबदली करण्यात आले आहे. या प्रदर्शनात कथा, कादंबरी ,लहान मुलांचे साहित्य इंग्रजी पुस्तकांच्या स्वरूपात उपलब्ध आहे.पुणे हे पुस्तक प्रेमींचे शहर आहे.

पुण्यातील पुस्तक प्रेमींना येथे प्रदर्शनात वाचण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.या प्रदर्शनात पुस्तकांची भिंत व पुस्तकांची खुर्ची तयार करण्यात आली आहे. तसेच नवोदित लेखकांची पुस्तके प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत.त्यामुळे पुण्यातील पुस्तक प्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने या प्रदर्शनास भेट द्यावी व आपल्या आवडीची पुस्तके कमीत कमी दरात खरेदी करावीत असे आवाहन प्रदर्शनाच्या आयोजकांनी केले आहे.

पुणे, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED