“जर रमाई झीजली नसती तर भीवाचा भीमराव झाला नसता” -भन्ते कीर्ती बोधी

68

🔸सम्यक बुद्ध विहारामध्ये माता रमाई यांचा स्मृतिदिन साजरा

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.27मे):-येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड मधील सम्यक बुद्ध विहारामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अर्धांगिनी माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त माता रमाई यांना विनम्र अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.

या कार्यक्रमाचे आयोजन भीम टायगर सेना, रमाई महिला मंडळ, शांतीदूत समिती यांनी केला होता.

कार्यक्रमाची सुरुवात विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारूणी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, आधुनिक भारताचे जनक महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमूर्ती माता रमाई यांच्या प्रतिमेला उपस्थित सर्वांच्या वतीने पुष्पहार अर्पण करुण विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी भन्ते किर्ती बोधी यांनी त्यागमूर्ती माता रमाई त्यांच्या संघर्षमय जीवनातील प्रसंग सांगून म्हणाले “जर रमाई झीजली नसती तर भीवाचा भीमराव झाला नसता…!” असे प्रतिपादन केले.

तर उपस्थित सर्वच महिलांनी माता रमाई यांच्या जीवनावरील भीम बुद्ध गीते गाऊन आदरांजली वाहिली.

यावेळी जिजाबाई दिवेकर, भारताबाई दिवेकर, सुभद्राबाई पाईकराव,ज्योती इंगोले उषा इंगोले, ललिता कदम,शांताबाई दिवेकर, अनिता दिवेकर सिद्धार्थ दिवेकर (शहराध्यक्ष भीम टायगर सेना उमरखेड), प्रफुल दिवेकर (सामाजिक कार्यकर्ते उमरखेड), बुद्धभुषण इंगोले इत्यादी अनेक समाज बांधव उपस्थित होते.