अमळनेर येथे आपल्या मयत वडिलांना मुलीने दिला अग्निडाग

32

✒️अमळनेर(पुरोगामी न्युज नेटवर्क)

अमळनेर(दि.28मे):–अमळनेर येथील सेवा निवृत्त प्राथमिक शिक्षक स्व भगवान देवराम महाजन यांचे अल्पशा आजाराने दिनांक २४ मे २०२२ रोजी निधन झाले.ते जि.प. सदस्य नानाभाऊ पोपट महाजन यांचे मेहुणे होते.आपल्या भारतीय संस्कृती पुरुष प्रधान संस्कृती असल्याने मयत व्यक्तीस अग्निडाग मुलगा देत असतो परंतु त्यांना मुलगा नसल्याने या सर्व अनिष्ट रूढी परंपरांचा विचार न करता स्व.भगवान महाजन यांना त्यांची एकुलती एक मुलगी सौ नितु दिनेश शेलकर यांनी अग्नि डाग दिला.तसेच स्व.भगवान महाजन यांच्या अंत्ययात्रे प्रसंगी भाऊ अशोक देवराम महाजन, पुतण्या प्रमोद सुभाष महाजन, जावई दिनेश जगन्नाथ शेलकर, यांचेसोबत मुलगी सौ.नितू दिनेश शेलकर यांनी वडिलांना खांदा देवून मुलाचे कर्तव्य पार पाडले .

मुलगा जरी वंशाचा दिवा असला तरी मुलगी ही त्या दिव्याची वात असते आता महिलांना समान हक्क लागू झाला आहे. वंशाचा दिवा हा मुलगाच असतो , वडिलांना खांदा व अग्निडाग देण्यासाठी मुलगा पाहिजे अशी संकल्पना समाजात अस्तित्वात होती मात्र आता हळू हळू समाजाने नवनवीन बदल स्वीकारले पाहिजेत. मुलीही आता मुलांच्या बरोबरीने सर्व कामे करता हेत आजच्या या घटनेने माळी समजातील मुलीने मुलाचे विधी करून एक नवा आदर्श समजापुढे ठेवला आहे याचा सर्व नवीन पिढीला सार्थ आभिमान आहे.

स्मशानभूमीत स्व भगवान महाजन यांना अखेरचा निरोप देण्यासाठी श्री संत सावता माळी युवक संघाच्या तालुका महिला आघाडी अध्यक्षा कीर्ती मोहन महाजन, माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री महाजन, बिजली सुनील महाजन, शीतल नकुल महाजन तसेच अमळनेर माळी समाज पंचमंडळ व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.