उच्च श्रेणी मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांची रिक्त पदे तात्काळ भरून विज्ञान शिक्षकांना वेतनश्रेणी देण्यात यावी

50

🔸महा.पुरोगामी शिक्षक समितीचे प्रधान सचिवाला निवेदन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.28मे):-जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडवण्याच्या दृष्टीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात यावे याकरिता महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा चंद्रपूरच्या वतीने प्रधान सचिव , शालेय शिक्षण व क्रीडा विभाग , मंत्रालय मुंबई (महाराष्ट्र राज्य) यांना २७ मे २०२२ ला निवेदन देण्यात आले .

चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत सन २०१९ पासून उच्च श्रेणी मुख्याध्यापकांची ८२ पदे रिक्त असून पदोन्नतीसाठी विलंब होत आहे . तरी तात्काळ उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदे भरण्याचे निर्देश देण्यात यावे .गेल्या तीन वर्षांपासून जवळपास ५० केंद्रप्रमुख पदे रिक्त असून अजूनही पदोन्नती झालेली नाही , ती तात्काळ करण्यात यावी. ३३% विज्ञान विषय शिक्षक यांनी पदवी प्राप्त करूनही वेतनश्रेणी लागू करण्यात आलेली नाही .याबाबत संघटनेच्या वतीने सनदशीर मार्गाने अनेकदा चर्चा करण्यात आली. पण दप्तर दिरंगाईमुळे समस्या अजूनही प्रलंबित असून , याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होत आहे .

त्यामुळे सदर प्रकरणात प्रत्यक्ष लक्ष घालून जिल्हा परिषद चंद्रपूर प्रशासनाला निर्देश देऊन समस्या निकाली निघेल यासाठी प्रधान सचिव , शालेय शिक्षण व क्रीडा विभाग , मंत्रालय मुंबई (महाराष्ट्र राज्य) यांना एका निवेदनादवारे मागणी महा.पुरोगामी शिक्षक समितीचे राज्यनेते विजय भोगेकर, राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, राज्याध्यक्ष महिला मंच अल्का ठाकरे,राज्य सचिव निखील तांबोळी, जिल्हा प्रमुख सल्लागार दिपक व-हेकर, जिल्हा नेता नारायण कांबळे,जिल्हाध्यक्ष किशोर आनंदवार, जिल्हा सरचिटणीस संजय चिडे, जिल्हा कार्याध्यक्ष गंगाधर बोढे, जिल्हा कोषाध्यक्ष सुनिल कोहपरे, कार्यालयीन सचिव सुरेश गिलोरकर जिल्हा उपाध्यक्ष मोरेश्वर बोंडे, रवि सोयाम, सुधाकर कन्नाके, लोमेश येलमुले,जिल्हा नेता महिला मंच सुनिता इटनकर, महिला मंच अध्यक्ष विद्या खटी, महिला मंच सरचिटणीस पौर्णिमा मेहरकुरे, महिला मंच कार्याध्यक्ष सिंधु गोवर्धन, महिला मंच कोषाध्यक्ष लता मडावी, महिला मंच उपाध्यक्ष पुनम सोरते, सुलक्षणा क्षिरसागर, सहसचिव दुष्यंत मत्ते, प्रमुख संघटक नरेश बोरीकर, महिला मंच प्रमुख संघटक ज्ञानदेवी वानखेडे यांनी केलेली आहे असे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख लक्ष्मण खोब्रागडे यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.