माननीय आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त ६०किलो वजनी जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा संपन्न

63

✒️मनोहर गोरगल्ले खेड(राजगुरुनगर विशेष प्रतिनिधी)

आमदार दिलीप आण्णा मोहिते पाटील यांच्या ६४व्या वाढदिवसानिमित्त राजमुद्रा ग्रुप निमगाव खंडोबा व महाराज कबड्डी संघ निमगाव दावडी यांच्या संयुक्त विद्यमाने व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने भव्य कबड्डी स्पर्धा २०२२ चे ६० किलो वजनी गटातील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यावेळी स्पर्धेचे उद्घाटन आमदार दिलीप मोहिते यांचे पुतणे माननीय मयूर मोहिते माजी सभापती नवनाथ शेठ होले उपसरपंच मा.दिलीप भगत, रामकृष्ण टाकळकर, माजी सरपंच शिवाजीराव राऊत अध्यक्ष बबनराव जगन्नाथ शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला दिलीप आण्णा मोहिते पाटील यांनी प्रमुख उपस्थिती दाखवली. त्या वेळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला कैलास लिंबोरे उद्योगपती आकाश भगत व मोहनराव तांबे, मनोहर तांबे,बाळासाहेब भालेकर, दावडीच्या सरपंच सौ राणीताई डुंबरे, ग्रामपंचायत सदस्या सो.रुपालीताई काळे, बबन शेठ होले उद्योगपती, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर व इतर मान्यवर उपस्थित होते.

पंच म्हणून सूर्यकांत अण्णा मुटके, प्रकाश गाडे, शंकर करमाळे व शिंदे सर यांनी काम पाहिले.विजयी संघ पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक महाराणा कबड्डी संघ कळम इंदापूर, दुसरा क्रमांक महाराजा कबड्डी संघ निमगाव दावडी, तिसरा क्रमांक बाणेर युवा कबड्डी संघ बाणेर, चौथा क्रमांक नागेश्वर कबड्डी संघ चर्होली यांनी पटकावला.कार्यक्रमाचे आयोजन पैलवान राजकुमार महाराज राऊत उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांनी केले होते