कोटगांव – पाहार्णी मार्गावरुन रेतीची तस्करी-उमरेड व नागपुरला जाते रेती!

79

🔹ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्याचे नुकसान-प्रशासनाचे दुर्लक्ष

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागभिड(दि.30मे):- तालुक्यातील कोटगांव , पाहार्णी, टेकरी या मार्गावरुन दररोजची अवैद्य वाळु तस्करी होत आहे. माञ याकडे कोणाचेही लक्ष नाही. शासनाला माञ लाखोचां चुना लागत आहे. गेल्या अनेक दिवसापासुन या मार्गावर दिवस राञ वाळुची तस्करी होत आहे. माञ प्रशासनच अनभिज्ञ आहे. ही शोकांतीका समजावी काय ? टी.पी.चा वेळ सकाळी 8 वाजल्या पासुन सांयकाळचे 5 वाजे पर्यंत असल्याचे समजते. माञ या मार्गावरुन दिवस राञ रेतीची वाहतुक केल्या जाते. हे कुठल्या नियमात बसते. एकीकडे घरकुल लाभार्थ्यांना रेती मिळत नाही. जादा भावाने रेती खरेदी करावी लागते.

अनेकांचे रेती अभावी काम रखडले आहेत. माञ रेती तस्कर जोमात आहेत. गेल्यां आठ दिवस अगोदर माजी संरपच व गावांतील प्रशिस्टित नागरिक, पाहार्णी येथील एका ट्रक्टर मालकावर राञोला रेती आणली म्हणुन कारवाई झाली. माञ अवैद्य रीत्या जी रेतीची तस्करी होत आहे. हे प्रशासनाला दिसत नाही काय ? की प्रशासनाचे वाळु/ रेती माफीया सोबत संबंध जुडले आहेत. ॽ या अवैद्य रेती तस्करी मुळे शासनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे याला जबाबदार कोण ? नागभीड -ब्रम्हपुरी–तळोधी–या महामार्गावरुण , मेन रोडवरुण अवैध गौण खनिज ,ओव्हरलोड रेतीचे ट्रक चालतात.अवैध गोण खनिज उत्खनन दिवस–राञो चालत आहेत, तेव्हा नियम कुठे जातात. सर्वसाधारण माणसांना नियम आहेत माञ वाळु तस्करांना नियम नाहीत काय ? ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

रस्ता फुटलेला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. पावसाळ्यात हेच खड्डे जिवघेणे ठरत असतात. तरी प्रशासन सुस्त आहे. रस्ते बनवायला करोडो रुपये खर्च होतात. क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात रेती भरुन जात असल्याने रस्त्याचीही वाट लागत आहे.या मार्गावरुन होत असलेल्या वाहतुकीमुळे नागरीकही परेशान झाले आहेत.रेती तस्कराकडुन साईड दिल्या जात नाही. भरधाव वेगाने वाहन चालवल्या जातात. अपघाताचे प्रमाणात वाढ झाली असुन ,प्रवाश्याला जिव मुठीत घेऊन मार्गावर प्रवास करावा लागतो.