तात्यासाहेबांच्या सत्यशोधकांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार ” देऊन सन्मान…

28

🔸पुरस्काराने ऊर्जा मिळत असते – पी.डी.पाटील व लक्ष्मण पाटील सर

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.30मे):– येथील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूलचे आदर्श शिक्षक पी.डी.पाटील व गुड शेफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलचे उपशिक्षक लक्ष्मणराव पाटील यांना जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथील अल्पबचत भवन येथे दि. २९ मे, २०२२ रविवार रोजी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ केंद्रीय कार्यालय गुरुकुंज आश्रम जिल्हा अमरावती संचालित ” गुरुदेव सेवा मंडळ जळगाव खान्देश ” यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रास्ताविक गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा प्रचार अधिकारी हरिश्चंद्र माधव बाविस्कर, उपाध्यक्ष आशाबाई बाविस्कर, विजय बाविस्कर यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबईचे आमदार रमेश दादा पाटील होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जळगावचे आमदार राजु मामा भोळे यांनी केले. दीपप्रज्वलन माजी आमदार चंद्रकांत सोनवणे व चोपड्याचे आमदार लताबाई चंद्रकांत सोनवणे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त पोलीस इन्स्पेक्टर विलासराव दुतंडे, कवयित्री विमल वाणी, नायब तहसीलदार बी.आर.शिंदे, कोळी महासंघाचे राज्य सचिव सुभाष प्रल्‍हाद कोळी, ज्येष्ठ समाजसेवक भिका कोळी, मोरया ग्रुपचे अध्यक्ष हरी भाऊ सपकाळे, पोलीस कॉन्स्टेबल अनिल सपकाळे, जिल्हा रुग्णालयाचे मंगेश बाविस्कर पत्रकार अमृत महाजन, अडवोकेट विलास बाविस्कर, संतोष मिस्तरी, संपादक प्रमोद रोहणकर, भारतीय मानवाधिकार परिषद अध्यक्ष केदु देसले, आदी मान्यवर उपस्थित होते.सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवराय, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, विद्येची देवता सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त विविध क्षेत्रात शैक्षणिक सामाजिक पत्रकारिता पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या बंधू – भगिनींना सन्मानपत्र, ट्रॉफी पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले व पुरस्कारार्थी बंधू – भगिनींचे अभिनंदन व कौतुक केले. संस्थेचे जिल्हाध्यक्ष हरिचंद्र बाविस्कर यांनी संस्थेच्या सामाजिक कार्याची माहिती दिली तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या विचारां वर चालण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी महाराष्ट्रातील यवतमाळ, बुलढाणा, जळगाव, नाशिक, नगर, मुंबई, कल्याण या जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण, पत्रकारिता, वृक्षमित्र अशा विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणारे १०८ बंधू – भगिनींना राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये सुवर्णमहोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगावचे पी.डी.पाटील व गुड शेफर्ड इंग्लिश मिडीयम चे उपशिक्षक लक्ष्मणराव पाटील यांना सन्मानपत्र, ट्रॉफी, ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

आम्हाला आमची सामाजिक, शैक्षणिक कार्याची दखल घेऊन गुरुदेव सेवा मंडळाने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे आम्ही करत असलेल्या शैक्षणिक, सामाजिक कार्याची पावती आहे. पुरस्काराने बळ व ऊर्जा मिळते. आम्ही ही ऊर्जा घेऊन सातत्याने शैक्षणिक, सामाजिक कार्य करणार व राष्ट्रसंतांच्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न करणार असे प्रतिपादन पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक पी.डी.पाटील व लक्ष्मणराव पाटील यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र पाटील, कलाशिक्षक सोनवणे सर आभार ज्येष्ठ समाजसेवक संग्राम ठोकरे, शेतकरी संघाचे हिम्मत पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुरुदेव सेवा मंडळ जळगाव जिल्हा खान्देश संपूर्ण विश्वस्त मंडळ, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.