उस्माननगर ते मुखेड जाणाऱ्या महामार्गाचे काम संथ गतीने होत असल्याने व कौठा येथिल बसवेश्वर चौकातील महामार्गावरील नालीच्या कामासाठी महामार्गावर रास्तारोको आंदोलन

70

✒️हानमंत चंदनकर(विशेष प्रतिनिधी)

नांदेड(दि.30मे):-कंधार तालुक्यातील मौजे कौठा येथिल महामार्गावरील बसवेश्वर चौकातील नाली तंडूब भरले होणारे शिरस्ता निष्क्रिय दर्जाचे असून उस्माननगरहुन मुखेडकडे जाणार्या महामार्गावरील काम अगदी बेजबाबदार गतीने होत असून रस्त्यावरी धूरवळा हवेत पसरून सबंध नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे व पावसाळ्यापूर्वी महामार्गावर कामपूर्ण व्हावे मौजे कौठा येथिल मुख्य आसलेल्या मा.बसवेश्वर चौकातील व चौक परिसरातील घाणीचे साम्राज्य पसरलेल्या नालीचे काम अर्धवट रस्त्याचे काम व. कच्ची नाली भरलेल्या नाल्या लवकर साफ करून द्यावे असे निवेदन प्रशासनाला देऊन आज कौठा येथून जाणार्या महामार्गावर बेमुदत सत्याग्रह व रस्त्यारोको आंदोलन कौठा येथिल माजी सरपंच व्यंकटराव घोरपडे साहेब, कंधारचे माजी सभापती माणिकराव चोपवाड ,नायगावचे सामाजिक कार्यक्रते गजानन पाटील चव्हाण, रामराव महाराज भेटगावकर आत्मदहनतेचा इशारा देणारे परमेश्वर घोरपडे माधव घोरपडे,पी एम राजेश्वर मौजे कवठा येथील सर्व जेष्ठ नागरिक सर्व राजकीय कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते समस्त गावकरी मंडळी व यांच्यासह अनेक आंदोलन कर्ते रस्त्यावर उतरून पशासनाला जनतेची व.सामान्य नागरिकांना ह्या महामार्गावरील होणारी अनेक ठिकाणी मोठमोठे अक्सिडेंट काही जणांना प्राण गमवावे लागले व धूळ आणी धूळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.

अशा अनेक रस्त्यावरील मागण्यासाठी संबंधीत प्रशासनासह ठेकेदार कंपनीला धारेवर धरत हे आंदोलन शातंत पार पडावे यासाठी कंधार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पडवळ साहेब व त्यांच्याटीमसह उपस्थित होते आंदोलन शांततामय वातावरण पार पडले याप्रसंगी रूद्रायणी कंपनीचे डी.पी.एम राजेश्वर यांनी आंदोलन कर्ताना पंधरा 15 दिवसाच्या मुदतीत हे काम आम्ही करू असे आश्वासन यावेळी दिले कुठल्याही प्रकारची नासधूस न करता आंदोलन शांततामय वातावरण पार पडले….