


🔸विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवभारताच्या निर्मितीचे शिल्पकार – विवेक बोढे
✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)
चंद्रपूर(दि.31मे):-मंगळवार 31 मे रोजी सकाळी घुग्घुस येथील *मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात* केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव तसेच मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला अष्टवपुर्ती निमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. तसेच केंद्रातील मोदी सरकारने यशस्वी ०८ वर्ष पूर्ण केले आहेत. त्या निमित्ताने केंद्र सरकारच्या वतीने देशभरात विविध उपक्रम राबवून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. देशातील शेवटच्या घटकातील नागरिक विकासापासून वंचित राहु नये त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने लाभार्थ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.
या योजना मध्ये प्रधानमंत्री आवास योजना, किसान सन्मान निधी, उज्ज्वला गॅस योजना, पोषण अभियान, मातृ वंदना योजना, स्वच्छ भारत मिशन, जल जीवन मिशन, अमृत योजना, प्रधानमंत्री स्व निधी योजना, एक राष्ट्र एक राशन कार्ड योजना, गरीब कल्याण योजना, आयुष्मान भारत योजना, जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना अश्या विविध लोक कल्याणकारी योजनांचा समावेश आहे.
याप्रसंगी मोठया संख्येत लाभार्थ्यांनी व नागरिकांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे संबोधन ऐकले.
यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी सभापती नितु चौधरी, माजी पस उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी सरपंच संतोष नुने, नकोडा सरपंच किरण बांदूरकर, भाजपाचे विनोद चौधरी, साजन गोहने, वैशाली ढवस, शाम आगदारी, बबलू सातपुते, विजय आगरे, विनोद खेवले, प्रवीण सोदारी, ऋषी कोवे, शरद गेडाम, विवेक तिवारी, मानस सिंग, महेंद्र मेश्राम, इर्शाद खान, विक्की सारसर, सचिन कटकूरवार, शुभम बावनकुळे, सुभाष मशाखेत्री, अभिजित सिंग, सोनू रॉय, दादू साहू, पियुष कांबळे, नाजीम सिद्दीकी, प्रशांत कुम्मरवार, मुकेश कामतवार, सौरभ कागदेलवार उपस्थित होते.




