शिरीष भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण तसेच मोफत शासकीय अर्ज भरुण देण्याचे शिबीर

29

🔹रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत शेतकरी हीत जोपासनार- शिरीष भोसले यांचा संकलप

✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)

बीड(दि.31मे):-शेतकरी संघटनेच्या माध्यमातून नेहमीच शेतकरी हीत जपणारे आणि शेतकर्यांच्या प्रश्नाला नेहमीच वाचा फोडणारा शेतकरी नेता म्हणून शिरीष भोसले यांची ओळख आहे..येत्या 2 जुनला त्यांचा वाढदिवस असुन तो दिवस आपण सामाजिक उपक्रम हाती घेऊन साजरा करणार असल्याचे ते म्हणाले…. वाढदिवसानिमित्त शेतकरी बांधवांना सर्व शेतकरी योजनेचे मोफत फाॅम भरून देण्याचे आयोजन केले असुन सिद्धीविनायक दुकान पांढरवाडी रोड गेवराई येथे हे शिबिर पार पडणार असुन शेतकरी बांधवांनी या मोफत शिबीराचा लाभ घेण्यासाठी आपल्या कागदपत्राबरोबर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे…..

त्याचबरोबर घटत चाललेल्या वृक्षलागवडीमुळे हवामानात बदल होत असुन निसर्गात आणि हवामानात अनियमिता आली आहे… वृक्षलागवड ही काळाची गरज ओळखून येत्या पावसाळ्यात कमीतकमी 200 झाडांचे वृक्षारोपण करूण जुन्या व कोवळ्या रोपांची बांधणी करणार असल्याचे देखील नियोजन आहे…
खरीप हंगाम 2020 व 2021 या दोन्ही वर्षी अतीवृष्टीच्या पावसाने शेती पिकांचे नुकसान झालेले आहे..

या संकटाने खचलेल्या गावगाड्यातल्या शेतकर्यांना धीर देण्यासाठी तसेच सर्व प्रकारच्या कृषी विभागाच्या योजनेचा लाभ शेतकर्यांना झाला पाहिजे या करीता ठिबक सिंचन, तुषार सिंचन, विहिरी ,शेततळे, टृॅक्टृर, पेरणी यंत्र,कांदाचाळ, रेशीम शेती, पोखरा योजना ईत्यादी तसेच अन्य शेतकरी उपयोगी योजनांचा लाभ शेतकर्यांना करुण देणार असल्याचे ते म्हणाले या करीता शेतकरी बांधवांनी या शिबीराचा लाभ घेण्यासाठी सिद्धीविनायक फर्म ला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.