गरोदर महिलांना गाव पातळीवरच रक्ताची सोय करण्यासाठी युवकांचे हात सरसावले

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.31मे):-गरोदरपणात महिलांना प्रसूतीच्या वेळी रक्तांची अत्यंत गरज असते. त्यावेळी त्या महिलेचे पती किंवा नातेवाईक यांना वेळेवर रक्तासाठी धावपळ करावी लागते .कधी कधी खूप अत्यंत गरज असताना सुद्धा वेळेवर रक्त मिळत नाही .रक्तासाठी धावपळ होऊ नये म्हणून चारुदत्त राऊत यांच्या मदतीने ज्या महिलांचे नाव नोंदणी करण्यात आले आहे अशा महिलांना मोफत रक्ताची सोय हवी त्या वेळेस करता येईल. यासाठी गावागावात महिलांची नावे नोंदणी करून माहिती भरल्या जाते व ज्या महिला गरोदर पणात नवव्या महिन्यात तिच्या नावाचा रक्तसाठा उपलब्ध करून ठेवण्यात येतो. रक्ताची गरज भासल्यास महिलांना त्वरित मोफत रक्त पुरवठा केला जातो.

हा उपक्रम युवा सामाजिक कार्यकर्ते तथा मारोडा ग्रामपंचायतचे सदस्य रोशन कोहळे यांनी सुद्धा गावापासून सुरू केला आहे .आणि पूर्ण गडचिरोली जिल्ह्यात हा उपक्रम राबवण्याचा त्यांचा ध्येय आहे. त्यासाठी युवक ,प्राथमिक आरोग्य केंद्रतील परिचारिका, गावातील अंगणवाडी सेविका. व आशा वर्कर्स यांची मदत लागेल प्रत्येक गावातील युवक, आशा वर्कर व परिचारिकांनी मदत करावी या उपक्रमात जास्तीत जास्त युवकांची मदत गरजेची असल्यामुळे युवकांनी या उपक्रमात जास्तीत जास्त संख्येने यावे ही असे आव्हान चारुदत्त राऊत व रोशन कोहळे यांनी केली आहे. मोबाईल नं 9325129100

गडचिरोली, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED