समाजकार्यातील अष्टपैलू व्यक्तिमत्व :पत्रकार विश्वास मोहिते

पाडळी( केसे) तालुका कराड येथील सामाजिक कार्यकर्ते साप्ताहिक तिरंगा रक्षक चे संपादक आणि आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्‍वास बाबुराव मोहिते यांचा 2 जून रोजी वाढदिवस साजरा होत आहे त्यानिमित्त… पाडळी (केसे), तालुका कराड येथील सामान्य कुटुंबातील पत्रकार विश्वास बाबुराव मोहिते यांनी आपल्या पत्रकारिता या क्षेत्रातील कार्याबरोबरच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रांमध्ये ही त्यांनी आपले नाव उज्वल करण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. विश्वास मोहिते यांनी आपले पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठ या विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण करून आपल्या पत्रकारितेला 2004 कराड येथील स्थानिक दैनिकातून सुरुवात केली. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी सुपने आणि तांबवे विभागाच्या समस्या निर्भीडपणे मांडून सर्वसामान्य नागरिकांच्या हृदया मध्ये आपल्या नावासाठी जागा निर्माण केली.

त्यांची निर्भीड आणि वास्तववादी लिखाण ही पद्धत सर्वसामान्य नागरिकांना आपलीशी वाटू लागली. पुढे त्यांनी कराड तालुक्या बरोबर सातारा जिल्ह्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध विषय निर्भिडपणे मांडून पत्रकारिता क्षेत्रांमध्ये आपलं स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न केला. कराड मधील दैनिकातून काम करत असताना स्वतःचं असं स्वतंत्र व्यासपीठ असावं,या उद्देशाने त्यांनी 2009 तिरंगा रक्षक नावाचे साप्ताहिक वर्तमानपत्र सुरू केले. आणि अल्पावधीतच त्याचा विस्तार सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर,पुणे रत्नागिरी,बीड, जिल्ह्यासह जवळपास चौदा ते पंधरा जिल्ह्यातून वर्तमानपत्राचा 20 विस्तारवाढ़ केला. त्यांच्या वर्तमानपत्रांमध्ये काम करणारा बातमीदार हा प्रत्येक जण संपादक मालक असेल या उद्देशाने त्यांनी वार्ताहरांना सदैव सोबत घेऊन काम सुरू ठेवले आहे. वार्ताहर मंडळी देखील वर्तमानपत्रात आपण बातमीदार नसून आपणच मालक आहोत या उद्देशाने जीवापाड प्रयत्न करून वर्तमानपत्रासाठी आणि वर्तमानपत्राच्या वाढीसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. यातूनच त्यांच्या संघटन कौशल्याचा एक विशेष पैलू नजरेस येत आहे. केवळ बातमीदारी वरती न थांबता त्यांनी धर्मादाय संस्था असावी.

आणि त्या संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब, गरजू, निराधार, अल्पसंख्यांक विधवा आणि परित्यक्ता यांना मदत करण्यासाठी विचारपीठ किंवा व्यासपीठ असावे म्हणून पाडळी (केसे), तालुका कराड या त्यांच्या गावी आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठान पाडळी (केसे) या सामाजिक संस्थेची स्थापना त्यांनी केली. त्यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनच संस्थेचे ध्येय आणि उद्देश याप्रमाणे विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या गुणवंत मंडळीचा सन्मान,गोरगरीब, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप विधवा, परितक्त्या महिलांना त्यांच्या घरगुती साहित्याची मदत अशा पद्धतीच्या विविध मदती त्यांनी संस्थेच्या माध्यमातून देण्यास सुरुवात केली. अल्पावधीतच त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे संस्थेचे नावही पश्चिम महाराष्ट्रात चमकू लागले आहे. दीनदुबळ्या,गोरगरीब जनतेच्या तोंडावरती आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठान चे नाव हे विश्वास मोहिते यांच्या सामाजिक बांधिलकीमुळे सदैव येऊ लागले आहे. लॉक डाऊन काळामध्ये त्यांनी जवळपास 50 ते 60 कुटुंबांना अन्नधान्याचा पुरवठा करण्याचा प्रयत्न केला.अशा पद्धतीने संस्थेच्या माध्यमातून आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून संपूर्ण लॉक डाऊन काळामध्ये त्यांनी संस्थेच्या माध्यमातून ही सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला. एवढ्यावरच न थांबता पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी पत्रकारांचे स्वतंत्र संघटना उभारण्याचा ही प्रयत्न केला आहे. अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या तिरंगा रक्षक ची संपादक विश्वास मोहिते यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतल्यास त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व दिसून येत आहे. त्यामुळे अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व वाढदिवसाच्या निमित्ताने लक्ष लक्ष शुभेच्छा पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

✒️बाबासाहेब कांबळे(शिराळा)

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, लेख, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED