शहरवासीयांनी शहरात सायकलच का वापरावी?

25

[आंतरराष्ट्रीय सायकल दिवस सप्ताह विशेष.]

शारीरिक शक्तीने चालविले जाणारे दोन चाकी वाहन म्हणजे सायकल होय. अनेक ठिकाणी हे वाहतूक, व्यायाम व खेळ यांचे मुख्य व स्वस्त साधन आहे. हे साधन तीन तसेच चार चाकीही असू शकते. ती पायांनी चालविता येणारी व लोखंडी फ्रेम असणारी असते. या वाहनाने प्रदूषण अजिबात होत नाही. तिच्या उत्पादनासाठी पंजाब, हरियाणा ही राज्ये अग्रेसर आहेत. दोन वर्षांपासून गडचिरोली शहरात सायकल स्नेही मंडळ स्थापन होऊन कार्यरत आहे. ते मंडळ येथील अनेक लोककल्याणकारी कार्यात सक्रिय सहभाग घेत असते. श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजींच्या शब्दशैलीतून वाचा ज्ञानवर्धक माहिती… संपादक.

जवळपास दोन शतकांपासून आपण सायकलीचा वाहतुकीसाठी वापर करत आहोत. सायकलीच्या वापराबाबत जनजागृती निर्माण होण्यासाठी सायकल दिन साजरा केला जातो. हल्ली थोड्या अंतराच्या प्रवासासाठीही दुचाकी आणि चारचाकींचा सर्रास वापर केला जातो. त्यामुळे प्रदूषण, तापमान वाढीचे प्रमाण वाढले आहे. दिल्लीमध्ये तर वाढत्या प्रदूषणाला रोखण्यासाठी सम-विषमचा प्रयोग केला गेला. वाढत्या प्रदूषणाचा धोका वेळीच ओळखला नाही तर दिल्लीसारखी परिस्थिती आपल्या शहरातही उद्भवू शकते. त्यामुळे यावर उपाय करता येण्याजोगा एकच पर्याय आहे. तो म्हणजे शक्य तेवढ्या जास्त प्रमाणात प्रवासासाठी सायकलचा वापर करणे. प्रदूषण रोखण्यासोबतच शारीरिक आरोग्यासाठीही सायकल चालविणे उत्तम व्यायाम ठरतो. त्यामुळे प्रत्येकाने आठवड्यातून किमान एक दिवस तरी सायकल चालविण्याचा निर्धार करावा. सायकल चालविण्याचे आरोग्यदायी आणि पर्यावरणीय फायदे लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करावी. शहरात सायकल चालविण्याची संस्कृती रुजविण्यासाठी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संघटना आणि व्यक्तींनी पुढाकार घेतला पाहिजे. लोकांचा सायकलकडे पाहण्याचा दुय्यम दृष्टिकोन बदलण्याची व सायकलिंगमुळे होणारे फायदे समजावून सांगितले पाहिजे. एवढेच करून चालणार नाही. शहरातील मार्केट, मॉल, रेल्वेस्थानक, बसस्थानक अन्य महत्त्वाच्या ठिकाणी सायकल पार्क करण्याची व्यवस्था असावी. सायकल संस्कृती रुजविताना जी वागणूक रस्त्यावरून मोटारसायकल, कार चालविणार्‍यांना मिळते तीच सायकलिंग करणार्‍यांना मिळाल्यास सायकल चालविण्याकडे नागरिकांचा कल वाढविण्यास मदत होईल. पालक पाल्यांना ५० ते ६० हजार रुपयांची मोटारसायकल घेऊन देतात. पण दहा हजार रुपयांची सायकल घेऊन देत नाही. कारण ते त्यांना प्रतिष्ठेचे वाटत नाही. मोटारसायकलच्या किमतीपेक्षा महागड्या सायकल मिळतात. त्याने आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत व पैशाची बचत आणि अपघातांना पायबंद लावणे शक्य होते. परंतु ते सर्व या माहितीपासून अनभिज्ञ नव्हे तर झोपेचे सोंग घेऊन आहेत.

न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र- युनायटेड नेशन्स महासभेने ३ जून हा दिवस जागतिक सायकल दिवस- वर्ल्ड बायसीकल डे म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. याच्या उद्घाटन सोहळ्यात संयुक्त राष्ट्राचे अधिकारी, मुत्सद्दी, ॲथलेट्स, सायकलिंग समुदायाच्या अधिवक्त्यांसह मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. यावेळी सायकल चालवण्याचे महत्त्व आणि आरोग्यासाठी होणारे फायदे सांगण्यात आले होते. हा दिवस प्रथम ३ जून २०१८ रोजी अधिकृतपणे साजरा करण्यात आला होता. दैनंदिन जीवनात सायकलीचा वापर लोकप्रिय करण्याच्या उद्देशाने हा दिवस जगभरात साजरा केला जात आहे. हा दिवस सायकलचे वैशिष्ट्य आणि त्याचे अष्टपैलुत्व ओळखण्यासाठी साजरा केला जातो. सायकल चालविणे केवळ शारीरिक आरोग्यासाठीच चांगली नाही, तर ते पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेसाठी देखील अनुकूल आहे. यावर्षी म्हणजेच २०२२ साली पाचवा जागतिक सायकल दिवस साजरा केला जात आहे. असे म्हटले जाते की, शहरवासीयांना जवळपासच्या अंतररावर जायचे असल्यास त्यांनी सायकलचा वापर करावा. यामुळे दररोज शेकडो लिटर पेट्रोलची बचत होईल.

त्याचबरोबर शहरातील प्रदूषणाची पातळी देखील कमी होईल. याशिवाय नियमित सायकलिंग केल्याने हृदयरोग, स्ट्रोक, कर्करोग आणि मधुमेह यासारख्या आजारांमुळे होणार मृत्यूचा धोका कमी होण्यास मदत होते. दररोज ३० मिनिटे सायकल चालविणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असल्याचा डॉक्टरांचा विश्वास आहे. दररोज ३० मिनिटे सायकल चालवल्याने रात्रीची झोप चांगली येते. जर आपणास रात्री झोप न लागण्याचा त्रास असेल, तर नियमित सायकल चालविल्याने आपल्या या समस्येचे निराकरण होऊ शकते. एका संशोधनानुसार एखादा व्यक्ती दररोज ३० मिनिटे सायकल चालवत असल्यास त्याचे मेंदू सामान्य व्यक्तीपेक्षा अधिक सक्रिय राहते. तसेच ब्रेन पॉवर १५ ते २० टक्क्यांनी वाढण्याची शक्यताही असते. सायकलिंग केल्याने रोगप्रतिकारक यंत्रणेला योग्यरित्या कार्य करण्यास मदत होते. एका अहवालानुसार दररोज अर्धा तास सायकल चालविल्याने इम्यून सेल्स सक्रिय होतात आणि कोणताही आजार होण्याचा धोका कमी करतात. सायकलिंग शरीरातील अतिरिक्त कॅलरी बर्न करण्यास मदत करते. नियमित सायकलिंग करून शरीरातील अतिरिक्त कॅलरी सहज बर्न करता येते. शारीरिक शक्तीने चालविले जाणारे दोन चाकी वाहन म्हणजे सायकल होय. अनेक ठिकाणी हे वाहतूक, व्यायाम व खेळ यांचे मुख्य व स्वस्त साधन आहे. हे साधन तीन तसेच चार चाकीही असू शकते. ती पायांनी चालविता येणारी व लोखंडी फ्रेम असणारी असते. या वाहनाने प्रदूषण अजिबात होत नाही. तिच्या उत्पादनासाठी पंजाब, हरियाणा ही राज्ये अग्रेसर आहेत. दोन वर्षांपासून गडचिरोली शहरात सायकल स्नेही मंडळ स्थापन होऊन कार्यरत आहे. ते मंडळ येथील अनेक लोककल्याणकारी कार्यात सक्रिय सहभाग घेत असते.

जगातील काही देशांमध्ये सायकल चालविण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. यामध्ये नेदरलँड देशाचा उल्लेख अवश्य करावा. नेदरलँडमध्ये तेथील लोक वाहतुकीचे साधन म्हणून ४० टक्के सायकलचा वापर करतात. यासाठी ठिकठिकाणी पार्किंग व्यवस्था, वाहतुकीचे नियम, सहज उपलब्धता या सर्व गोष्टींमुळे तिथे सायकल संस्कृती चांगली रुजली आहे. परदेशात कुठल्याही पायाभूत सुविधा उभारताना सायकलस्वारांची सोय लक्षात घेतली जाते. पायाभूत सुविधा उभारताना सर्वप्रथम पादचारी, सायकलस्वार, सार्वजनिक वाहतूक आणि त्यानंतर खासगी वाहने अशा पद्धतीने रस्त्यांची आणि पार्किंगची आखणी केली जाते. नेदरलॅण्डमध्ये सन २०१४मध्ये एक अनोखा प्रयोग करण्यात आला. तिथे किलोमीटरभर लांब रात्री चमकणार्‍या सायकल ट्रॅकची निर्मिती करण्यात आली आहे. फ्लोरोसंट रंगाचे विशिष्ट तुकडे सिमेंट-काँक्रीटमध्ये वापरण्यात आले असून दिवसाच्या प्रकाशात ते ऊर्जा साठवून घेतात व रात्रीच्या अंधारात हाच रस्ता उजळून निघतो. स्पेनमधील सॅन सबॅस्टियन या शहरात सन २००९ साली जुन्या रेल्वेच्या बोगद्याचे रूपांतर सायकल ट्रॅकमध्ये करण्यात आले. हा जगातील सर्वात लांब सायकल बोगदा आहे. विशेष म्हणजे सायकलस्वारांच्या सुरक्षिततेसाठी यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा बसवण्यात आले आहेत. भारतातही सायकलचा वापर फार पूर्वीपासून होत आहे. सायकल हेच दळणवळणाचे प्रमुख साधन होते. मात्र देशात सायकलसाठी म्हणून काही विशेष पायाभूत सुविधा उभारल्या गेल्याचे फारसे दस्तावेज उपलब्ध नाहीत. सायकलिंगबद्दलचे प्रेम वाढत आहे याबाबत शंका नाही, परंतु सायकलसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी लागणार्‍या राजकीय इच्छाशक्तीचा आपल्याकडे अभावच आहे, असे खेदाने म्हणावे लागेल!

!! पुरोगामी एकता परिवारातर्फे समस्त भावाबहिणींना विश्व सायकल दिन सप्ताहाच्या निरामय जीवनास्तव हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

✒️श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी- अलककार(म.रा. डि.शै. दै.रयतेचा कैवारीचे लेख विभाग प्रमुख व जिल्हा प्रतिनिधी)रामनगर- गडचिरोली, व्हा. नं- ७४१४९८३३३९.