केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना १ जुलै पगारवाढ होणार??

50

✒️प्रतिनिधी नागपूर(चक्रधर मेश्राम)

नागपूर(दि.1जून):-केंद्र सरकारचे कर्मचारी आणि जवळपास ६५ लाख पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. देशभरात सध्या महागाईने उच्चांक गाठला आहे मात्र, यापासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळू शकतो. केंद्र सरकार १ जुलैपासून महागाई भत्त्यात वाढ करण्याची शक्यता आहे.

महागाई भत्ता पुन्हा ४ टक्क्यांनी वाढणार?१ जुलै पासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ( Dearness Allowance) ४ टक्के वाढण्याची शक्यता आहे. जर ही वाढ करण्यात आली तर भत्ता ३४ टक्क्यांवरून ३८ टक्के करण्यात येईल.दरम्यान केंद्र सरकारने मार्चमध्येच महागाई भत्त्यात वाढ केली होती. देशात सध्या महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एप्रिलमध्ये किरकोश महागाईचा दर ७.७९ टक्के या उच्चांकावर पोहोचला असून अन्नधान्य महागाईचा दर ८.३८ टक्के आहे.

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना जून २०१७ पासून ७ व्या वेतन आयोगाचा लाभ मिळत आहे. यामुळे सद्यस्थितीला जर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाली तर महागाई भत्ता ३८ टक्के होऊन केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होऊ शकते.किमान वेतन १८ हजार कर्मचाऱ्याचे मूळ वेतन १८ हजार रुपये असल्यास त्याला सध्या ३४ टक्के दराने ६ हजार १२० रुपये महागाई भत्ता मिळतो. आता महागाई भत्ता ३८ टक्के झाल्यास कर्मचाऱ्यांना ६ हजार ८४० रुपये महागाई भत्ता मिळेल. सातव्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन किमान १८ हजार रुपये आहे.