एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला गावगुंडाने पाजले विष

🔺गेवराई तालुक्यातील संतापजनक घटना

✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)

गेवराई(दि.2जून):- माझ्यासोबत लग्न कर” म्हणत ऊसतोड कामगाराच्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला गावातीलच गुंडाने विष पाजल्याची घटना समोर आली आहे. यावेळी कुटुंबातील व्यक्तींनी वेळीच सतर्कता दाखवत, त्या गुंडाच्या तावडीतून मुलीला सोडवले आणि तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या पीडित मुलीवर उपचार सुरू आहेत. ही संतापजनक घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील काजळवाडीमध्ये रात्री आठच्या दरम्यान घडली आहे.

अधिक माहिती अशी की, नुकतीच इयत्ता दहावीची परीक्षा देणारी 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपले आई-वडील ऊसतोडणीसाठी कारखान्याला गेल्यामुळे चुलत्याकडे राहत होती. हीच संधी साधून गावातील 25 वर्षीय तरुण तिची छेड काढत असे. गेल्या दोन वर्षांपासून तो सतत पीडित मुलीला त्रास देत असून ”माझ्यासोबत लग्न कर”, असं म्हणत सतत धमक्या देत असल्याचे समोर आले आहे.

काल (दि. ३१ मे) या नराधम तरुणाने पीडितेच्या घरी जाऊन पुन्हा तिला धमकावले. ”माझ्यासोबत लग्न कर असं म्हणत त्याने त्या अल्पवयीन मुलीला विष पाजले”. यादरम्यान कुटुंबातील व्यक्तींनी वेळीच सतर्कता दाखवली आणि त्या गुंडाच्या तावडीतून पीडित मुलीला सोडवले. तिला तत्काळ जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले. सध्या पीडितेवर आयसीयू वार्डात उपचार सुरू आहेत. दरम्यान तलवाडा पोलीसांकडून पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

Breaking News, क्राईम खबर , महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED