आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकाराने देव्यानी इंगोले यांच्यावर मुंबई येथे मोफत हृदय शस्त्रक्रिया !

🔹3 लक्ष रुपयांची मोफत शस्त्रक्रिया, इंगोले कुटुंबाला मिळाला दिलासा !

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.2जून):- विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार हे मतदार संघामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवतांना दिसून येतात. ते सातत्याने नाविन्यपूर्ण काम करण्यात अग्रेसर असतात. अशीच त्यांच्याकडे आरोग्याचा विषय घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला नेहमी सहकार्य करतांना दिसत असून रुग्णसेवेला प्राधान्य देऊन रुग्णांना दिलासा देण्याचे काम आमदार देवेंद्र भुयार करत आहे.
मोर्शी तालुक्यातील पार्डी येथील ७ वर्षाची चिमुकली देव्यानी सुनील इंगोले यांची ३ लक्ष रुपयांची हृदय शस्त्रक्रिया आ. देवेंद्र भुयार यांचे माध्यमातून मुंबई येथे एस आर सी सी हॉस्पिटल हाजी आली रुग्णालय मुंबई येथे मोफत करण्यात आली.

आमदार देवेंद्र भुयार यांच्या रुग्णसेवेमुळे देव्यानी सुनील इंगोले यांना तात्काळ वैद्यकीय सुविधा मिळाल्याने जसलोक हॉस्पिटल मुंबई येथे यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली असून देव्यानीला नवे आयुष्य मिळाले.आमदार देवेंद्र भुयार यांच्या माध्यमातून देव्यानी सुनील इंगोले या चिमुकलीला मुंबई येथील नामांकित रुग्णालयात दाखल करून सर्व उपचार मोफत उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे इंगोले कुटुंबाला दिलासा मिळाला. आमदार देवेंद्र भुयार यांच्या या जागरूक पणामुळे फार मोठा आरोग्याचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे इंगोले परिवाराने आमदार देवेंद्र भुयार, रुग्णसेवक पंकज ठाकरे यांचे आभार मानले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED