समाज एकजुटीमुळेच नांदेड येथे महात्मा बसवेश्वर पुतळ्याची निर्मिती… संजय बेळगे

26

✒️नायगाव प्रतिनिधी(हानमंत चंदनकर)

नायगाव(दि.2जून):-बाराव्या शतकातील अंधश्रद्धा निर्मूलनकार, लोकशाहीचे जनक, जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा भव्य दिव्य पुतळा नांदेड शहरात उभारला जावा या मागणीसाठी लिंगायत समाजाने एकजूट दाखवली त्यांच्या एकजुटीमुळेच नांदेड शहरात महात्मा बसवेश्वर यांचा भव्य पुतळ्याची निर्मिती झाली असे प्रतिपादन जि. प. शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी आयोजित जयंती सोहळा कार्यक्रमात व्यक्त केले.

नायगाव तालुक्यातील मौजे शेळगाव छत्री येथे महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जयंती महोत्सव कार्यक्रमात अध्यक्षस्थानी संजय बेळगे तर उद्घाटक म्हणून देवीदास पाटील बोमनाळे, प्रमुख वक्ते शिवानंद दापशेटकर, चंद्रकांत आमलापुरे व सत्कार मूर्ती आणि प्रमुख उपस्थिती मध्ये नायगाव पंचायत समितीचे सभापती विठ्ठलराव केते, प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. माधव विभुते, वैजनाथ तोंनसुरे, विठ्ठल ताकबिडे, सरपंच जळवा वाघमारे, विकास पाटील भुरे, सौ. नम्रता कोरनुळे, विश्वनाथ बडूरे, शिवाजी पा. कहाळेकर, अँड. नारायणराव लंगडापुरे, ताकबिड चे सरपंच शिवराज वरवटे, लालवंडी येथील सरपंच युवराज लालवंडे, निळकंठ कुरे, श्याम पाटील चोंडे, माधव कोरे, बसवेश्वर गुडपे, आकाश पाटील धुपेकर, बालाजी धोते, रणजित कुरे, विश्वनाथ बोंमनाळे यासह आदी मान्यवरांचा सहभाग होता. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर व महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केल्यानंतर शेळगाव छत्री येथील जयंती मंडळाचे पदाधिकारी यांच्या वतीने मान्यवरांचा सन्मान करण्यात आला तर प्रस्तावना महेश बडुरे यांनी केली.

यावेळी अनेकांनी महात्मा बसवेश्वर यांच्या अथांग कार्यावर आपल्या मनोगतातून प्रकाश टाकला.बेळगे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना पुढे म्हणाले की, समाज एकसंघ पणाने उभारल्यास कोणतीही गोष्ट सहजपणे साध्य होते, वंदनीय महात्मा बसवेश्वर यांचे महान विचार पुढे ठेवून आपण समाज हितासाठी पुढे जावे, शिवा संघटना व बसव ब्रिगेडच्या सामाजिक कार्यामुळेच महात्मा बसवेश्वर यांचे महानकार्य समाजासह बहुजन समाजाला कळाले आहे ही बाब खूपच सर्वांसाठी अभिप्रेत ठरते असेही ते म्हणाले .

यावेळी संजय पाटील चोंडे, माजी सरपंच संजय पाटील अनेराये, तानाजी पाटील अनेराये, उत्तमराव पोलीस पाटील पांडे, मारुती आप्पा मठपती, विठ्ठल पाटील आणेराये, शिवा संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेश अनेराये पहेलवान, माधव ऐंजपवाड यासह गावातील महिला पुरुष यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाचे सुरेख असे सुत्रसंचलन कवी व्यंकट अनेराये यांनी केले तर आभार विजय आनेराये यांनी मानले.
चौकट……………………..
बालाजी गुरुनाथ धोत्ते यांची शिवा संघटना विद्यार्थी आघाडी नायगाव तालुकाध्यक्षपदी निवड करून कार्यक्रम अध्यक्ष संजय बेळगे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
चौकट……………………….
महात्मा बसवेश्वर जयंती मंडळ पदाधिकाऱ्यांनी गावातील प्रत्येक जातीतील प्रतिनिधीत स्वरूपात प्रमुख घटकांचा सन्मानासह ग्राम स्वच्छता महिलांचाही सन्मान केले एवढे विशेष.