कृषी विभाग आत्मा अंतर्गत कौशल्य आधारित कामे बीबीएफ आणि ट्रॅक्टर द्वारे पेरणी करणारे शेतकरी प्रशिक्षण संपन्न

34

✒️अमोल उत्तम जोगदंडे(प्रतिनिधी उमरखेड)

उमरखेड(दि.3जून):- दिनांक 01/06/2022 रोजी तालुका सिडस फार्म बेलखेड उमरखेड येथे आत्मा अंतर्गत कौशल्य आधारित कामे बि बि एफ आणि ट्रॅक्टर द्वारे पेरणी करणारे चालक,शेतकरी यांचे प्रशिक्षण आयोजित करणात आले होते.या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रस्थाविक श्री गंगाधर बाळवंतकर तालुका कृषी अधिकारी उमरखेड मार्गदर्शक यांनी केले.प्रमुख मार्गदर्शक श्री अक्षय इनजाळकर (शास्त्रज्ञ )कृषी विज्ञान केंद्र दारव्हा यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बि बि एफ पद्धतीने पेरणी का करावी व कशी करावे बि बि एफ पद्धतीने पेरणी मुळे बियाणे व खताची बचत होते.

चार ओळी नंतर सरी पडल्यामुळे हवा खेळती राहून पिकांना मुबलक प्रमाणात सूर्यप्रकाश मिळतो तसेच सरीमध्ये पाणी जास्तीचे झाल्यास सरी वाटे पाणी शेतातून बाहेर पडते त्याच बरोबर मूलस्थानी जलसंधारण होते पावसात खंड पडल्यास ह्या सरी चा फायदा पिकाला मिळतो प्रत्यक्ष प्रात्याक्षिक करून दाखविले आणि त्यांचे फायदे व महत्व पटवून सांगितले तसेच सोयाबीन तूर या पिकावर तांत्रिक सविस्तर मार्गदर्शन केले.सदरील प्रशिक्षणात श्री सुदर्शन कदम पीक स्पर्धा पुरस्कार प्राप्त शेतकरी यांनी त्यांचे अनुभवातून बेडवर उत्तम व विक्रमी उत्पादन कसे घेतले याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

तसेच श्री शिवाजी शिंदे बि बि एफ धारक शेतकरी यांनी सुद्धा त्यांचे अनुभव सांगितले,सदरील कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री प्रशांत गुंडारे कृषी पर्यवेक्षक यांनी केले. उपास्थित श्री चांदुरकर शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र दारव्हा ,श्री महेश्वर बिचेवार विदुळ आत्मा बी एफ ए सी सदस्य,श्री श्रीरंग लिंबाळकर मंडळ कृषी अधिकारी ढाणकी-1,श्री सुनील देशपांडे मंडळ कृषी अधिकारी ढाणकी-2, श्री सोनटक्के मंडळ कृषी अधिकारी उमरखेड, रत्नदीप धुळे btm ,सर्व कृषी पर्यवेक्षक,कृषी सहाय्यक कृषी,कृषी मित्र व शेतकरी होते.