प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या वाढदिवसा निमित्त भव्य रक्तदान व रोगनिदान शिबिराचे आयोजन

28

🔹गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचा उपक्रम

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

देसाईगंज(दि.3जून):-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष,लोकनेते, जनसेवक,गोरगरीबांचे कैवारी नाना पटोले यांच्या वाढदिवसा निमित्त ५ जुन २०२२ रोजी रविवारला सकाळी १२ वाजेपासुन ते दुपारी ३ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतिने कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा येथील राजे जंगशहा सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान तज्ञ डाॅक्टरांकडुन आरोग्य तपासणी व उपचार करण्यात येणार आहे. आयोजीत रक्तदान शिबिराचे उद्घाटन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या हस्ते पार पाडण्यात येणार आहे तर अध्यक्षस्थानी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष जीवन पा.नाट हे राहणार असुन सहउद्घाटक म्हणून कुरखेडा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जयंत हरडे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.ज्या कुणाला रक्तदान करावयाचे असेल अथवा आरोग्य तपासणी करावयाची असेल त्यांनी चेतन काटेंगे,सदाराम काटेंगे,बाबूराव कुलसंगे, तुळशीराम बोगा,सुधाकर मेश्राम,युवराज पा.बावनथडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन शिबीराचे आयोजक गडचिरोली जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नंदु नरोटे, मार्गदर्शक साबु सेठ यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.