तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर चिंचाळा(शास्त्री) येथील अपत्तीग्रस्ताला मिळाली मदत- शुभम मंडपे यांच्या प्रयत्नाला यश

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चिमुर(दि.4जून):–मौजा चिंचाळा (शास्त्री) येथिल दौलतजी गजभिये यांच्या तीन वर्षां अगोदर 2019 मध्ये पावसामुळे अति वृष्टीमुळे घराची भिंत पडून 10 शेळ्या जागीच ठार झाल्या होत्या. 2019 ला लोटून तीन वर्षे पूर्ण झाले मात्र या घटनेचे आवेदन देऊन सुद्धा या घटनेकडे दुर्लश होत होते. अपत्तीग्रस्त दौलत गजभिये यांची फाईल एका टेबल वरून दुसऱ्या टेबल वर धूळ खात होती आणि दौलतजी गजभिये यांनी प्रशासनाकडून मदत मिळेल याची आशा पण सोडली होती.मात्र समाज कार्यात अग्रेसर असणारे आंबोली ग्राम पंचायतचे सदस्य व वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शुभम मंडपे व त्यांचे सहकारी मनोज सरदार यांच्या लक्षात हे प्रकरण येताच त्यांनी तहसील कार्यालयात धाव घेतली व या प्रकरणाबद्दल प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला होता.

चिमूर चे तहसीलदार प्राजक्ता बुरांडे व नायब तहसीलदार कोवे आणि मेहेर बाबूजी यांच्या सहकार्याने या प्रलंबित प्रकरणाचा पाठपुरावा करीत चिमूर तहसीलदार यांच्या आदेशाने दि 1 मे 2022 ला दौलत गजभिये यांना पशुधन खरेदीसाठी शासनाकडून मदत मनुन 27000 हजाराचा धनादेश प्राप्त करून दिला.यामुळे मौजा चिंचाळा(शास्री) येथील अपत्तीग्रस्त दौलत गजभिये यांना तब्बल तीन वर्षानंतर दिलासा मिळत आहे.यावेळी धनादेश देतांना करतांना चिमूर चे तहसीलदार प्राजक्ता बुरांडे, नायब तहसिलदार कोवे, मेहेर बाबू व आंबोली ग्राम पंचायत सदस्य शुभम मंडपे व जेष्ठ समाजसेवक मनोज सरदार व आपत्तीग्रस्त दौलतजी गजभिये धनादेश स्वीकारताना उपस्थित होते

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED