खासदार पती आणि अभिनेत्री पत्नी यांच्या घटस्फोट प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय…८ वर्ष झाले लग्नाला पण पत्नीने…?

36

✒️चक्रधर मेश्राम(विशेष प्रतिनिधी)मो:-9623459632

मुंबई(दि.4जून):-चित्रपट अभिनेत्री वर्षा प्रियदर्शिनी आणि अभिनेता-लोकसभा खासदार अनुभव मोहंती यांचा घटस्फोट प्रकरण सध्या खुपच चर्चेत आले आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. दरम्यान, अनुभव मोहंती यांच्या याचिकांवर कटकच्या एडीजेएम न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने वर्षा प्रियदर्शिनी यांना अनुभव मोहंती यांचे वडिलोपार्जित निवासस्थान दोन महिन्यांत रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर अनुभव मोहंती यांनी वर्षाला देखभालीसाठी दरमहा ३० हजार रुपये देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. प्रियदर्शनीच्या विरोधात याचिका दाखल केली होती…

अनुभव मोहंती यांनी वर्षा विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती की, त्यांनी त्यांचे वडिलोपार्जित घर सोडावे, मी त्यांच्यासाठी स्वतंत्र घराची व्यवस्था करण्यास तयार आहे. याशिवाय दुसऱ्या याचिकेत त्यांनी वर्षा यांच्या उत्पन्नाचे स्रोत उघड करण्याची मागणी केली होती. गेल्या आठवड्यात न्यायालयाने सुनावणीनंतर निकाल राखून ठेवला होता.

कोणी किती दिवस वाट पहायची?…
वास्तविक, घटस्फोट प्रकरणात खासदार अनुभव मोहंती यांनी सोशल मीडियावर अनेकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा केला आहे. नुकताच त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने पत्नीसोबतच्या शारीरिक संबंधांचा उल्लेख केला होता. ते म्हणाले होते, आमच्या लग्नाला आठ वर्षे झाली, पण इतकी वर्षे झाली तरी पत्नी वर्षा हिने संबंध ठेवण्यास परवानगी दिलेली नाही. मी मानसिक तणावातून जात आहे. अजून किती दिवस कोणी वाट पहावी, मला माझ्या पत्नीपासून घटस्फोट हवा आहे, पण प्रकरण आता कोर्टात आहे.

अनुभव मोहंती या सुप्रसिद्ध ओडिया चित्रपट अभिनेत्याने 2013 मध्ये राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 2014 मध्ये त्यांनी वर्षा प्रियदर्शिनीशी लग्न केले. मात्र, काही दिवसांनी दोघांमध्ये मतभेद झाल्याची बातमी समोर आली आणि पती-पत्नीचे नाते बिघडले. 2016 मध्ये पहिल्यांदा अनुभव मोहंती यांनी पत्नी विरोधात याचिका दाखल केली होती की, आमच्या लग्नाला दोन वर्षे झाली आहेत, पण पत्नी प्रियदर्शिनी सेक्स करू देत नाही. 2020 मध्ये घटस्फोटाची याचिका दाखल करण्यात आली होती . यानंतर अनुभव मोहंती यांनी 2020 मध्ये पत्नी प्रियदर्शिनीला घटस्फोट देण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. यानंतर वर्षा यांनी मोहंती यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार आणि इतर महिलांशी संबंध असल्याचा आरोपही केला