“छावणी” नाटकाच्या प्रस्तुतीने साजरा होणार प्रेमानंद गज्वींचा अमृत महोत्सव !

39

✒️मुंबई(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मुंबई(दि.4जून):-नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त ‘थिएटर ऑफ रेलेवन्स नाटय सिध्दांत आणि बोधी नाट्य परिषद आणि श्री शिवाजी स्मारक मंडळ (रजि)’ बुधवार दिनांक 15 जून 2022 रोजी सलग तीन प्रयोग. सकाळी 11 वाजता, दुपारी 4 वाजता आणि रात्री 7.30 वाजता. श्री शिवाजी नाटयमंदिर दादर येथे सादर करीत आहेत,नाटक “छावणी” महोत्सव !

भारताने आपले सार्वभौमत्व सत्य,अहिंसा आणि स्वातंत्र्य या आपल्या जन्मसिद्ध हक्काच्या तत्त्वांद्वारे प्राप्त केले.गांधींच्या नेतृत्वाखाली अहिंसेतून स्वातंत्र्य मिळवून जगात नवा इतिहास रचला. न्याय, समता आणि शांतता यासाठी नवीन संविधान निर्माण केले. विविधतेला सोबत घेऊन विसंगतीला दूर करण्यासाठी संविधानाच्या आधारे जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीने आपला ध्वज फडकावला.भारतात पसरलेल्या जातिवादामुळे होणारे शोषण आजही एक मोठे आव्हान आहे. वर्ण, जात आणि धर्मांधता हे मोठ्या जनसंख्येचे शोषण आजही करत आहेत.’बंदुकीच्या गोळीने सत्ता मिळते’ या विचारसरणीवर विश्वास ठेवणाऱ्यांना धर्म आणि जातीवर आधारित शोषणाला आधार बनवून शस्त्रक्रांती करून देशाचे संविधान पलटवायचे आहे.अगदी तसेच जसे वर्णवाद्यांना भारताला हिंदू राष्ट्र बनवायचे आहे.

भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाने वामपंथी विचारधारा आणि दक्षिणपंथी विकाराला नाकारून अहिंसेतून स्वातंत्र्य मिळवले आणि जनतेला सर्व प्रकारच्या शोषणातून मुक्त करण्यासाठी अहिंसेच्या मार्गाने संविधान निर्माण केले.आज सशस्त्र क्रांति करणारे आणि वर्णवादी,संविधानाला आव्हान देत आहेत. आज भारताला आपले संविधान वाचवण्याची अत्यंत आवश्यकता आहे.

याच क्रमाने संविधानाचे पुरस्कर्ते नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी ‘छावणी’ हे नाटक लिहिले आहे. शोकांतिका ही आहे की, संविधानाच्या बाजूने असलेल्या या नाटकाला महाराष्ट्र रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाने (सेन्सॉर बोर्ड) देशद्रोही ठरवून प्रमाणपत्र देण्यास नाकारले होते. मात्र बऱ्याच चर्चा संघर्षानंतर प्रमाणपत्र मिळाले. पण गेल्या सात वर्षांपासून कुठल्याच रंगकर्मीने या नाटकाची प्रस्तुती केली नाही.थिएटर ऑफ रेलेवन्स नाटय सिद्धांताचे प्रयोगकर्ते व रंगकर्मी 15 जून 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता, दुपारी 4.00 वाजता व रात्रौ 7.30 वाजता,श्री शिवाजी नाट्यमंदिर येथे या नाटकाचे एकाच दिवशी तीन नाटयप्रयोग सादर करणार आहेत.

नाटक ‘छावणी’ :
प्रेमानंद गज्वी यांचे ‘छावणी’ नाटक गरीब, शोषित, दलित, बहुजन आणि आदिवासींना न्याय मिळवून देण्याच्या नावाखाली हिंसा करणाऱ्या कारस्थान्यांचा पर्दाफाश करते!
– मंजुल भारद्वाज.

नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्याबद्दल :

प्रेमानंद गज्वी हे शोषणाविरुद्ध लिहणारे आणि संविधानसंम्मत राष्ट्र पाहणारे नाटककार आहेत.99 व्या अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना मिळाला आहे. ‘किरवंत,गांधी-आंबेडकर,तन-माजोरी, घोटभर पाणी’ त्यांची ही नाटके विद्यापीठीय अभ्यासक्रमात समाविष्ट झालेली आहेत. हिंदी, कन्नड,तेलगू, बंगाली,छत्तीसगढी, इंग्रजी, रशियन भाषेत अनुवाद झाले आहेत. तन-माजोरी या नाटकाचा प्रयोग 1985 साली लन्डन येथे झालेला आहे.आत्तापर्यंत सर्व नाट्यकृतीचे 10,000 प्रयोग झालेले आहेत.

दिग्दर्शक रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांच्याबद्दल :
“थिएटर ऑफ रेलेवन्स” नाट्य सिद्धांताचे सृजक आणि प्रयोगकर्ता मंजुल भारद्वाज असे रंगचिंतक आणि रंग आंदोलक आहेत, जे राष्ट्रीय आव्हानांना फक्त स्विकारत नाहीत तर आपला रंग विचार “थिएटर ऑफ रेलेवन्स” च्या माध्यमातून ते राष्ट्रीय उदिष्ट जन-माणसांसमोर ठेवतात. गेल्या 30 वर्षांपासून, म्हणजे एक चतुर्थांश शतकाहून अधिक काळ, थिएटर ऑफ रेलेव्हन्स नाटय सिद्धांताचे रंगकर्म करून जिवंत आहे. कोणतीही सत्ता, कॉर्पोरेट किंवा राजनैतिक पार्टीच्या आश्रयाविना भारतभर रंग आंदोलनाला उत्प्रेरित करत आहे. जगातील अनेक देशांमध्ये ‘थिएटर ऑफ रेलेव्हन्स’ नाटय सिद्धांतावर आधारित कार्यशाळांसोबत नाटकांची प्रस्तुती केली आहेत.

कलाकार :
रंगकर्मीं अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के,प्रियांका कांबळे,सुरेखा साळुंखे आणि अन्य कलाकार.

थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांत :

थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य तत्व मागील 30 वर्षांपासून आपल्या नाट्य प्रस्तुतीतून निरंतर कलात्मक सृजन प्रक्रियांना उत्प्रेरीत करत आहे. सृजनशील विचारांच्या, कलासत्वाच्या, तात्विक प्रतिबद्धतेच्या आणि विवेकशील प्रतिरोधाच्या हुंकारने विश्वाला सुंदर आणि मानवीय बनवण्यासाठी समर्पित आहे.मागील 30 वर्षांपासून ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ या नाटय़ सिद्धांताने सतत कोणत्याही देशीविदेशी अनुदानाशिवाय आपली कलेप्रति जबाबदारी आणि कर्तव्ये निभावली आहेत. प्रेक्षक सहभागाच्या आधारावर मुंबईपासून मणिपूरपर्यंत हे ‘रंग आंदोलन’ सुरू आहे. ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ ने जीवनाला नाटकाशी जोडून आपल्या कलात्मक नाटकांच्या माध्यमातून फॅसिस्टवादी ताकदींशी ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ लढत आहे !

बोधी नाटय परिषद, मुंबई :

बोधी म्हणजे ज्ञान..knowledge.
ज्ञानासाठी कला.. हे सूत्र घेऊन बोधी नाट्य परिषद साहित्य क्षेत्रात काम करते. कविता,कथा, कादंबरी, नाटक या विषयावर लेखन कार्यशाळा घेते. गेली 18 वर्ष उत्तम लेखनासाठी 11 बोधी (ज्ञान) सूत्रे लेखकापर्यंत पोचविण्याचं काम करते. आजवर महाराष्ट्रभर 43 लेखन कार्यशाळांचं आयोजन बोधी नाटय परिषदेने केलेले आहे.