मुप्टा टिचर्स असोसिएशनच्या पुणे ग्रामीण च्या अध्यक्ष पदी प्रा.राजेंद्र सोनवणे यांची एकमतांनी निवड

✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)

पुणे(दि.4जून):-शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी गेली २५ वर्षांपासुन आक्रमकपणे लढा देणा-या महाराष्टराज्य स्तरावरील शिक्षक संघटनेच्या पिंपरी चिंचवड, खेड, आंबेगाव, जुन्नर तालुका अध्यक्ष पदी संस्थेचे पुणेजिल्हा अध्यक्ष प्राचार्य सतिश वाघमारे यांनी नियुक्तपञ देऊन निवड घोषित करण्यात आली.यावेळी संंस्थेचे महाराष्ट प्रदेश सचिव प्रा.सुनिल मगरे (कार्याध्यक्ष-सामाजिक न्याय विभाग महाराष्टप्रदेश राष्टवादी काॅग्रेस पार्टी (उत्तर महाराष्ट व मराठावाडा विभाग)यांच्या शुभहस्ते निवडपञ देऊन अभिनंदन केले.याप्रसंगी संस्थेचे महाराष्ट राज्य अध्यक्ष डाॅ.संभाजी वाघमारे, पुणे जिल्हाअध्यक्ष प्राचार्य सतिश वाघमारे,प्राचार्य हनुमंत चव्हाण,पुणे जिल्हा सचिव सय्यद मुस्तफा,पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.सागर देवकर, प्रा.साळुंके, प्रा.राजभोग इ.मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

महाराष्ट अंडर प्रिव्हिलेजड टिचर्स असोसिएशन (मुप्टा)ही राज्यस्तरीय शिक्षक संघटनेने आताच नुकताच ना.शरद पवार, ना.अजितदादा पवार यांच्या उपस्थित रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले आहे.

मुप्टा ही आक्रमक संघटना आहे. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, सिनिअर व विद्यापीठास्तरावरील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यासाठी काम करत आहे.शासकीय,सरकारी व संस्थांकडून होणा-या पिळवणुकी विरोधी काम करत आहे.शिक्षक व सर्व कर्मचारी यांच्या २०% अनुदानित, विनाअनुदानित, पेन्शन,अनुदान व भरती प्रक्रीया, वेतनाचे बाबतच्या समस्या व विविध स्तरावरील मान्यता,विविध अडीअडचींना प्रभावीपणे न्याय मिळून देण्यासाठी काम करण्यासाठी प्रा.राजेंद्र सोनवणे यांची पिंपरी चिंचवड शहर,खेड,आंबेगाव,जुन्नर तालुकासाठी काम करण्यासाठी संस्थेने निवड केलेली आहे.मुप्टाची साथ म्हणजेच अन्यायावर मात ही भुमिका संस्थेची आहे.अन्याय होणा-या शिक्षक व कर्मचारी वर्गाने तातडीने संस्थेशी संपर्क करावा.संस्थाचालकांचा माजोरीपणा आणि अन्यायी पिडीत शिक्षकांना न्याय येथे मिळणार आहे.

प्रा.राजेंद्र सोनवणे यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.मुप्टा म्हणजे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाच्या अन्यायाला वाचा फोडणारी आक्रमण संघटना आहे

पुणे, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED