म्हशीने वाचविला वाघाच्या तावडीतून मालकाचा जिव

61

🔹उपचारासाठी चंद्रपूर ला रवाना

✒️प्रतिनिधी नेरी(नितीन पाटील)

चिमूर(दि.4जून):- तालुक्यातील ताडोबा बफर झोन क्षेत्रात येणाऱ्या पळसगाव वनपरिक्षेत्रातील मदनापूर येथील प्रभुजी गजभे वय ५६ वर्षे हे स्वताच्या व गावातील दुसऱ्या च्या अशा एकुण दहा- बारा म्हशी चराईसाठी मदनापूर पासुन दोन किलोमीटर अंतरावर विहीरगावच्या जवळपास शेतात नेले असता दबा धरुन बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला तेव्हा सर्व म्हशी वाघावर तुटून पडल्या व वाघाचा घटनास्थळापासून जंगलाच्या दिशेने खेदा केला या जिगरबाज म्हशीमूळे मूळे मालकाचा जिव वाचला .

वाघाच्या हल्लात प्रभूजी गजभे यांच्या पाठीला आणि मांडीला गंभीर जखमा केल्या याचं अवस्थेत त्यांनी विहीरगावा कडे धाव घेतली थोड्या अंतरावर विहीरगाव येथील शेतकरी तुकाराम नन्नावरे व त्यांच्या पत्नी आणि मुलगा शेतात काम करीत होते गजभे यांनी रक्त बंबाळ अवस्थेत आपला घडलेला प्रसंग सांगितला लगेच नन्नावरे यांनी विहीरगावात आणून मदनापूरला नेऊन दिले. उपचाराकरीता चिमूर येथे उपजिल्हा रुग्णालयात भरती केले असता डॉ यांनी तपासणी करून जखम गंभीर असल्यामुळे पूढील उपचारासाठी चंद्रपूर ला नेण्यात आले.