भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते पदी अँड. शिवानंद हैबतपुरे यांची निवडीबद्दल नायगावात कार्यकर्त्याकडून जल्लोष

✒️नायगाव प्रतिनिधि(हानमंत चंदनकर)

नायगाव(दि.4जून):-सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात आपल्या परखड विचाराने व प्रभावी भाषणाने सर्वत्र परिचित असणारे विशेषतः लिंगायत आणि बहुजन समाजात उल्लेखनीय भूमिका निभावणारे विचारवंत अँड.शिवानंद हैबतपुरे सर यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते पदी निवड करण्यात आली आहे.लातूर येथे झालेल्या समारंभात मा.मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते ना.देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना नियुक्ती पत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

मराठवाड्यात बहुसंख्येने असणारा लिंगायत समाज पारंपरिक भाजपा मतदार म्हणून ओळखला जातो पण सद्यस्थितीत राज्यात भाजपचे सरकार नाही येणाऱ्या काळात सत्ता स्थापनेसाठी लिंगायत समाजाची भूमिका निर्णायक ठरणार आहे म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील नेते मा.देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील,गोपीचंद पडळकर,अभिमन्यू पवार यांनी अँड शिवानंद हैबतपुरे यांची निवड केली आहे.श्री. हैबतपुरे यांच्या निवडणीने त्यांनी गेल्या दोन दशकाहुन अधिक विविध सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामाचा पक्षाला नक्कीच फायदा होणार आहे.ग्रामीण भागात महाराष्ट्रभर खेडोपाड्यात वैचारिक चळवळ प्रसाराचे काम त्यांनी आजतागायत केले आहे त्यामुळे थेट जनतेसी नाळ असणारा आणि लोकांच्या समस्या जाणून असणाऱ्या प्रखड व्यक्तिमत्त्वाची निवड पक्षांने केल्याचे बोलले जात आहे.

मा. अँड शिवानंद हैबतपुरे यांची प्रवक्ते पदी निवड झाल्याच्या निमित्ताने डॉ.हेडगेवार चौक ,नायगाव(बा) येथे भाजपा व लिंगायत समाजाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.यावेळी देविदास पा. बोंमनाळे,भगवानराव लंगडापुरे, रणजित पाटील कुरे,सरपंच युवराज लालवंडे,राजू बेळगे,बसवेश्वर गुडपे, नागेश कहाळेकर उपसरपंच, अवकाश पा. धुप्पेकर,केशव पांडागळे, शिवसांब कुरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED