योग दिनाच्या पूर्वतयारी निमित्त बैठकीचे आयोजन

25

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.5जून):-दि. 21 जून 2022 रोजी यावर्षीचा आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार आहे यानिमित्त शहरातील शासकीय विश्रामगृहावर दिनांक 4 जून रोजी पतंजली योग समिती गंगाखेड, रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळ, लायन्स क्लब गंगाखेड टाऊन व संत जनाबाई महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्वतयारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये येणाऱ्या योग दिनाचे नियोजन तसेच या वर्षी केंद्र सरकारने दिलेली थीम *मानवतेसाठी योगा*’ या आधारे शहरातील कापसे गार्डन, परळी रोड या ठिकाणी दिनांक 19 ते 21 जून असे तीन दिवसीय योग शिबिर आयोजित करण्याचे ठरले.

या बैठकीस गंगाखेड चे आमदार रत्नाकर गुट्टे यांची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत स्वाभिमानचे जिल्हा प्रभारी धोंडीराम शेप, पतंजली जिल्हा प्रभारी निखिल वंजारे, सोशल मीडिया जिल्हा प्रभारी गोपाळ मंत्री, योगशिक्षक प्रा.भानुदास राठोड, गंगाखेड तहसील प्रभारी राजू रेवनवार, पालम तहसील प्रभारी प्रकाश डीकळे ,योगशिक्षक हरिओम निरस, सचिन महाजन ,सचिन नावेकर, भगवान मुंडे, तहसील युवा प्रभारी मुरकुटे, मोहनाळकर ,जामगे, नावंदर,शिंदे,प्रा.सुर्वे, अतुल गंजेवार आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश डीकळे तर आभार प्रदर्शन गोपाल मंत्री यांनी केले.