ग्रामीण उद्योजकता जागृती विकास योजना कार्यक्रम संपन्न

26

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

चामोर्शी(दि.5जून):-डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालय चामोर्शी येथील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी जागरुकता कार्यानुभव कार्यक्रम व कृषी औद्योगिक जोड २०२२-२३ या अनुषंगाने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाऊन माती परीक्षण कसे फायदेशीर आहे व त्यासाठी अचुक नमुना कसा घेतला पाहिजे, याचे प्रात्यक्षिक करुन दाखविले.

या वेळी केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालय चामोर्शी येथील विद्यार्थी प्रणय वडस्कर,परिक्षीत झाडे,रोहित बोमनवार,कृणाल गहाने त्याच बरोबर शेतकरी वर्गातील गंगाधर सातपुते, लक्ष्मण सातपुते, सिंधु बाई सातपुते, जयवन सातपुते व खंडाळा येथील शेतकरी उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालय चामोर्शी प्राचार्य डॉ. आदित्य कदम , प्रा. छबील दुधबले विशेष तांत्रिक समन्वयक केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालय चामोर्शी, कार्यक्रम समन्वयक प्रा. चरडे सर , कार्यक्रम अधिकारी प्रा. उषा गजबिये तसेच विषय तज्ज्ञ प्रा. भोजराज कुंमरे यांचे मार्गदर्शन लाभले.