माजी आमदार अमरसिंह पंडित यांना विधान परिषेदवर संधी द्या

49

✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.5जून):- तालुक्याचे विकासाभिमुख नेतृव व राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मा आ अमरसिंह पंडित यांना विधान परिषदेवर घ्यावे अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष विधिज्ञ राजेश्वर चव्हाण यांच्याकडे करण्यात आली असल्याची माहिती मागास्वर्गीय सेलचे शहर अध्यक्ष धम्मपाल भोले व अल्पसंखाक जिल्हा उपाध्यक्ष सरवर खान पठाण यांनी दिली आहे .

या बाबत सविस्तर माहिती अशी की , येत्या २० जून रोजी विधान परिषदेच्या १० जागासाठी मतदान होणार आहे तसेच राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत यामध्ये बीडची आ संजय दौंड यांची जागा रिक्त झाली आहे तसेच बीड जिल्हासह मराठवाड्याचे नेतृव करण्याची धमक मा आ अमरसिंह पंडित यांच्याकडे आहे.

त्यांच्या कामांची प्रचिती अख्या महाराष्ट्राला माहित आहे गेल्या कित्येक वर्षापासुन पक्षाने दिलेली जबाबदारी ते चोखपणे बजावतात त्यांना विधान परिषदेवर संधी मिळाल्यास गेवराई तालुक्याच्या विकासाला चालना मिळेल तसेच पक्षाकडून एका निष्ठावान कार्यकर्त्याला न्याय मिळेल अशी अनेककांची भावना आहे पक्षाने त्यांना संधी दिल्यास निश्चितच येणाऱ्या नगर परिषद , जिल्हा परिषद , निवडणूकीत जिल्हात राष्ट्रवादी पक्षाची ताकद निर्माण होईल म्हणून गेवराई तालुक्याच्या नेतृवाला विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी पक्षाचे जिल्हाअध्यक्ष विधिज्ञ राजेश्वर चव्हाण यांच्याकडे करण्यात आली आहे अशी माहिती राष्ट्रवादीचे मागास्वर्गीय सेलचे शहर अध्यक्ष धम्मपाल भोले व अंल्पसंख्याक जिल्हाउपाध्यक्ष सरवर खान पठाण यांनी दिली आहे