देवळी गावात जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला

48

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.5जून):- केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालय, चामोर्शी येतील ग्रामीण उद्योजकता जागृती विकास योजनेतील विद्यार्थ्यांतर्फे 5 जून 2022 ला देवळी,तालुका – चामोर्शी, जिल्हा- गडचिरोली येथे जागतिक पर्यावरण दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. डॉ. आदित्य कदम तसेच श्री. छबिल दुधबळे प्रमुख उद्योजकता जागृती विकास योजना, श्री. उत्तम चरडे सह.प्रभारी, श्रीमती. उषा गजभीये कार्यक्रम अधिकारी, यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी सोनु अमृतकर, श्रुती गावातुरे, व रोहीनी बोरुटकर, यांच्या द्वारे कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

आपल्या सभोवताल असलेला परिसर पर्यावरण हे सर्व भौतिक, रासायनिक आणि जैविक घटकांचे एकत्रीकरण आहे जे एखाद्या जीव किंवा परिसंस्थेच्या लोकसंख्येवर परिणाम करतात आणि त्यांचे स्वरूप, जीवन आणि जगण्याची निर्धारण करतात. पर्यावरण हे असे आहे जे प्रत्येक प्राण्याशी संबंधित असते, ते आपल्या सभोवताल असते. पर्यावरण केवळ जीवनाचा विकास आणि पोषण करण्यातच मदत करत नाही तर त्याचा नाश करण्यास देखील मदत करते. वातावरण हवामान संतुलित ठेवण्यास मदत करते आणि हवामान चक्र राखते. कार्यक्रमाप्रसंगी गावातील सरपंच विनोद महादेव मडावी, गावकरी मंडळी व लहान बालगोपाल उपस्थित होते.

“”पर्यावरण जगवा वसुंधरा वाचवा.””