कलाशिक्षक अजय जिरापुरे ” राज्यस्तरीय अक्षर गौरव पुरस्कार ” ने सन्मानित..

34

✒️अमरावती(पुरोगामी न्युज नेटवर्क)

अमरावती(दि.5जून):-महाराष्ट्रातील जवळपास 350 पेक्षा जास्त चित्रकार, अक्षरप्रेमी, रांगोळीकार यांचे दिनांक 28 व 29 मे 2022 रोजी माझी शाळा माझा फळा समूह व स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय अक्षर संमेलन हे पंढरपूर येथे मोठ्या थाटात पार पडले…या संमेलनात धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, धामणगाव रेल्वे जिल्हा – अमरावतीचे कलाशिक्षक अजय जिरापुरे यांनी या संमेलनाप्रसंगी फलकावर ज्ञानाई सावित्रीबाई फुले यांचे व्यक्तिचित्राचे प्रात्यक्षिक सादर केले..

याप्रसंगी महाराष्ट्रातील विविध कलाकारांच्या चित्र प्रदर्शनांमध्ये कलाशिक्षक अजय जिरापुरे यांच्या शाळेच्या दैनंदिन फलकावरील चित्रकृतीचे प्रदर्शन भरवण्यात आले होते..सोबतच या राज्यस्तरीय अक्षर संमेलनात कलाशिक्षक अजय जिरापुरे यांना “राज्यस्तरीय अक्षर गौरव पुरस्कारा” ने जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ,शाल, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले..याप्रसंगी संमेलनाचे अध्यक्ष राज्याच्या महसूल व वन विभागाचे सहसचिव संजय इंगळे तथा शिक्षणाधिकारी डॉ.किरण लोहार, स्वेरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे , विठ्ठल मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड तसेच माझी शाळा माझा फळा समूहाचे व राज्यस्तरीय अक्षर संमेलनाचे संयोजक अमित भोरकडे स्वागताध्यक्ष प्रशांत वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते..*