अभाविप महानगरांचा “उत्कर्ष – 2022 व्यक्तिमत्त्व विकास शिबीर” उत्साहात संपन्न

45

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.6जून):- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा चंद्रपूर तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्कर्ष – 2022 व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर दिनांक 04 व 05 जून 2022 ला डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात संपन्न झाले. या शिबिराला चंद्रपूर महानगरातील विविध शाळा व महाविद्यालयाचे 112 विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

या शिबीराला उद्घाटक म्हणून ऍड.अभयजी पाचपोर, जिल्हा संयोजक प्रविण गिलबिले, नगर सह मंत्री वैदेही मुडपल्लीवर, शिबीर संयोजक पियूष बनकर यांची उपस्थिती होती. दीप प्रज्वलन व स्वामी विवेकानंद व माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून या शिबराची सुरुवात करण्यात आली.

यानंतर या शिबिराच्या वेगवेगळ्या सत्राला सुरुवात करण्यात आली. या मध्ये ऍड. नंदिता नायर यांनी सायबर अवेअरनेस या विषयांवर मार्गदर्शनपर माहिती दिली. यानंतर प्रा. शितल बोहरा यांनी करियर गायडन्स या या विषयावर मार्गदर्शन केले. यानंतर टीम बिल्डिंग एक अनुभूती हे खेळ खेळण्यात आले. यानंतर दुसऱ्या दिवशी मा.अमितजी पटले यांनी भावनिक बुद्धिमत्ता व व्यक्तिमत्त्व विकास या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांशी चर्चा केली. श्री. सुदर्शन बारपत्रे यांनी कला क्षेत्र व विद्यार्थी यावर मार्गदर्शन केले. यानंतर डॉ. प्रशांत आर्वे यांनी आजचा युवक व भारत या विषयावर वेगळे उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर ओपन माईक एक चर्चासत्र हे घेण्यात आले. त्यानंतर या शिबिराच्या समारोपीय सत्राला सुरुवात झाली. यास समारोपीय सत्राचे सूत्रसंचालन रोहिणी ठाकरे यांनी केले.

प्रस्ताविक शिबीर संयोजक प्रविण गिलबिले यांनी केले. अभाविप जिल्हा संयोजक यांच्या हस्ते उत्कृष्ट शिबिरार्थी विद्यार्थिनी व विद्यार्थी असे दोन पारितोषिक व सन्मान चिन्ह व प्रमाणातपत्र देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले . यानंतर समारोपीय भाषण अमितजी पटले यांनी केले. या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन सहनगर मंत्री वैदेही मुडपल्लीवार यांनी केले. या शिबीराला यशस्वी करण्याकरिता शैलेश दिंडेवार, वैदेही मुडपल्लीवार, भाग्यश्री नागपुरे, प्रियांका चिताडे, रोहिणी ठाकरे, पियुष बनकर , शकिल शेख, गणेश नक्षीने, जयेश भडगरे, निशांत नंदनवार, तन्मय बनकर,भूषण डफ, सूरज गुरणुले, कमलेश सहारे, आदी अभाविप कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी अभाविप कार्यकते व हितचिंतक व नागरिक उपस्थित होते.