पर्यावरणाचे संवर्धन काळाची गरज – तहसिलदार स्वरूप कंकाळ

32

🔸रॅली, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, प्रश्नमंजुषा, रांगोळी स्पर्धा, व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रमा च्या माध्यमातून पर्यावरणासंबंधी जनजागृती

✒️जालना(पुरोगामी न्युज नेटवर्क)

जालना(दि.6जून):– भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणा-या क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, औरंगाबाद, ग्राम पंचायत, वरुड, सार्वजनिक आरोग्य विभाग, वन विभाग, जालना आणि स्थानिक प्रशासन, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने व धरतीधन ग्रामविकास संस्था, जालना आणि ग्रामीण विकास प्रतिष्ठान, कोनड बू. यांच्या सहकार्याने वरुड बू. तालुका जाफ्राबाद, जिल्हा जालना येथे दिनांक 05 जून 2022 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना तहसिलदार स्वरूप कंकाळ यांनी पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले.

यावेळी रॅली, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, प्रश्नमंजुषा, रांगोळी स्पर्धा, व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष व तहसिलदार स्वरूप कंकाळ, क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, औरंगाबादचे प्रबंधक, संतोष देशमुख, CHO डॉ. गणेश पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिती राजगुरू, विस्तार अधिकारी गजानन लहाने, सरपंच संतोष ठाकरे, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष करडेल, तलाठी निवृत्ती वाघ, वनरक्षक सोनू जाधव, ग्राम सेवक राजेंद्र कंकाळ, धरतीधन ग्राम विकास संस्था, जालनाचे अध्यक्ष मिलिंद सावंत, आणि शाहीर नानाभाऊ परिहार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जाफ्राबादचे तहसिलदार स्वरूप कंकाळ यांनी दिपप्रज्वलन करून केले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे व विशेष अतिथींचे स्वागत रोप देऊन करण्यात आले.

यावेळी तहसिलदार स्वरूप कंकाळ यांनी उपस्थितांना पर्यावरण संवर्धनासंबंधी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष देशमुख यांनी केले, सूत्रसंचालन मिलिंद सावंत यांनी केले व आभार प्रदर्शन सहा. क्षेत्रीय प्रचार अधिकारी, प्रदीप पवार यांनी केले. कार्यक्रमा दरम्यान केंद्र शासनाचे पंजीकृत कलापथक आणि ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे शाहीर परिहार आणि संच यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आणि त्यावर उपाय यावर जनजागृती करण्यात आली.यावेळी आयोजित रॅली, स्वच्छता अभियान, प्रश्नमंजुषा आणि रांगोळी स्पर्धेत गावातील नागरिकांनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला. रांगोळी स्पर्धेत दिपाली करडेल, भाग्यश्री मोरे, सविता म्हस्के आणि मीराबाई पाचे यांनी तर प्रश्नमंजुषा स्पर्धेत सखाराम कदम, मीराबाई पाचे, मोहन इंगळे आणि राहुल अंधारे यांनी पुरस्कार पटकावले.

सर्व विजेत्यांना क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, औरंगाबाद तर्फे पुरस्कृत करण्यात आले. कार्यक्रम समाप्ती नंतर सर्व उपस्थितांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरोचे प्रदीप पवार, प्रिती पवार, राहुल मोहोड आणि प्रभात कुमार, धरतीधान ग्राम विकास संस्थेचे पदाधिकारी, ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या शाहिर परिहार व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.वरील बातमीस सर्व वर्तमानपत्रात प्रसिद्धी देऊन सहकार्य करावे, ही विनंती.

संतोष देशमुख
प्रबंधक
क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो
भारत सरकार, औरंगाबाद