सिरसदेवीतील राशन दुकानदाराचा कट्टे देताना व्हिडीओ व्हायरल

🔸गेवराई तहसीलदारांचे दुर्लक्ष

✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.6जून):- तालुक्यातील सिरसदेवी येथील दुकान क्र.०२ या राशन दुकानदाराचा गव्हाचे कट्टे देताना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गेवराई तहसीलदार यांचा राशन दुकानदारांवर धाक नसल्याचे दिसून येत आहे.

सविस्तर माहिती अशी की तालुक्यातील सिरसदेवी येथील राशन दुकानदाराने दिवसा ढवळ्या लोकांना चढ्या भावाने गव्हाचा कट्टा देत असताना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या सर्व प्रकारा कडे गेवराई तहसीलदार यांचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे.सिरसदेवीत खुलेआम दिवसा ढवळ्या राशन दुकानदार गव्हाचा कट्टा देत आहे तरी तहसीलदार साहेब करतात तरी काय राशन दुकांनदारावर गेवराई तहसीलदार यांचा धाक राहिला नाही का असा प्रश्न सामान्य माणसाला व कार्डधारकांना पडला आहे .या दुकानदाराच्या मागील काही दिवसात कार्ड धारकांनी जिल्हा अधिकारी ,पुरवठा अधिकारी ,गेवराई तहसीलदार यांना तक्रारी केल्या आहेत धान्य दिलेली पावती न देणे , शासनाच्या नियमा प्रमाणे राशन न देणे,दुकानावर भावफलक नसने, मोफतचे राशन आले असताना आले नाही म्हणून न देणे अश्या अनेक तक्रारी केल्या आहेत. परंतु या मुजोर दुकांनदारावर कसलीही कारवाई होत नसल्याने हा दुकानदार मुजोर होऊन दिवसा ढवळ्या लोकांना कट्टे वाटप करत आहे.

या दुकानदाराने मागील एप्रिल महिन्याचे 2022 मधील पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचे मोफतचे राशन आले असताना कार्ड धारकांना वाटप केले नाही यामुळे हा दुकानदार गोरगरीब लोकांचे राशन चोरून कट्टे देत असल्याचे दिसून येत आहे.यामुळे यापेक्षा अजून कसला पुरावा प्रशासनाला पाहिजे अशी ओरड कार्ड धारकांनी केली आहे. यामुळे या मुजोर राशन दुकानदाराचा परवाना मा.जिल्हा पुरवठा अधिकारी साहेब आत्तातरी परवाना रद्द करतील का नाही असा प्रश्न कार्ड धारकांना पडला आहे.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED