चिमूर तालुक्यातिल सर्व निवडणुकीत भगवा फडकविला जाणार-शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोड़े

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.7जून):-शिवसेनापक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, शिवसेना जिल्हासंपर्क प्रमुख चंद्रपूर प्रशांत कदम व शिवसेना चिमूर विधानसभा संपर्क प्रमुख आसिफ बागवान यांच्या सुचनेनुसार शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेश जिवतोडे यांच्या मार्गदर्शनखाली,शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमृत नखाते व शिवसेना विधानसभा समनव्यक भाऊरावं ठोंबरे यांच्या उपस्थित, शिवसेना तालुका प्रमुख चिमूर श्रीहरी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली, शिवसेना तर्फे चिमूर तालुक्यातील नेरी जिल्हा परिषद क्षेत्र, खडसंगी जिल्हा परिषद क्षेत्र, शंकरपूर जिल्हा परिषद क्षेत्र, भिसी जिल्हा परिषद क्षेत्र या समस्त क्षेत्रात आढावा बैठक घेण्यात आली.त्यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेश जिवतोडे यांनी सर्व शिवसैनिकांना, युवा सैनिकांना, पदाधिकारीना पक्षवाढी संदर्भात मार्गदर्शन केले.

तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायत, नगरपरिषद निवडनुका संदर्भात सर्वत्र शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला पाहिजे असे आदेश दिले. शिवसेना ही सामान्य जनतेच्या नेहमी पाठीशी उभी असते. असे भाष्य शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेश जिवतोडे यांनी केले.

यावेळेस उपस्थित मान्यवर शिवसेना उपजिल्हा प्रमुख चंद्रपूर अमृतभाऊ नखाते, विधानसभा सनम्यवक भाऊरावभाऊ ठोंबरे, शिवसेना तालुका प्रमुख चिमूर श्रीहरीभाऊ सातपुते, शिवसेना माजी तालुका प्रमुख वरोरा सुधाकर मिलमिले, शिवसेना नगरसेवक वरोराउपस्थित होते, नेरी जिल्हा परिषद उपतालुका प्रमुख किशोर उकुंडे, शंकरपुर जिल्हा परिषद उपतालुका प्रमुख रामभाऊ धारने, भिसी जिल्हा परिषद उपतालुका प्रमुख विनायक मुंगले, विभाग प्रमुख राजेंद्र जाधव, खडसंगी जिल्हा परिषद उपतालुका प्रमुख सूरज डूकसे यानी कार्यक्रम यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले. यावेळी समस्त पदाधिकारी,शिवसैनिक, युवासैनिक, महिला संघटिका उपस्थित होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED