शिवसेना महिला आघाडीच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण

62

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.7जून):-मानवाच्या निसर्गातील वाढत्या हस्तक्षेपामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा र्हास होत चाललेला आहे, त्यामुळे पृथ्वीवरील वातावरणाचे संतुलन अबाधित राखण्यासाठी शिवसेनेच्या पूर्व विदर्भ संघटीका प्रा.शिल्पाताई बोडके यांच्या सूचनेनुसार व शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा चंद्रपूर संघटीका नर्मदाताई दत्ताभाऊ बोरेकर यांच्या मार्गदर्शनात शिवसेना महिला आघाडी ब्रम्हपुरीच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ब्रह्मपुरी तालुक्यातील सौंदरी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वृक्षाच्या विविध प्रजातींचे रोपण महिलांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या उपतालुका संघटिका श्रीमती कुंदा कमाने, ग्रामपंचायत सौंदरीचे सरपंच तथा शिवसेना उपतालुका प्रमुख केवलराम पारधी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या रूपाली सेलोटे मंदाबाई यलतुरे, कांता चौधरी, लिलाबाई पारधी, गायत्री सेलोटे, मंजुळा पारधी, शेवंता जीरीतखान, भागरता कमाने, मीना दाणी व शारदा पारधी प्रामुख्याने उपस्थित होत्या.