अंनिस समितीच्या राज्य कार्यकारिणी मध्ये रूपेश वानखड़े यांची निवड

30

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.7जून):-नरेंद्र दाभोळकर स्थापीत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीची विस्तारित राज्य कार्यकारिणी नुकतीच औरंगाबाद येथील महात्मा गांधी विद्यापीठ येथील आर्यभट्ट सभागृहात संपन्न झाली.

यावेळी अध्यक्ष म्हणून भाई अविनाश पाटिल (धुळे) तर कार्याध्यक्ष म्हणून माधव बावगे (लातुर) यांची निवड झाली. तर राज्य युवा विभागात सहकार्यवाह म्हणून रूपेश वानखड़े (यवतमाळ) यांची निवड झाली.

रूपेश वानखड़े हे यवतमाळ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितिमध्ये गेल्या 15 वर्षापासून सक्रिय आहे. तसेच भारतीय बौद्ध महासभा, यवतमाळ जिल्हा सरचिटणीस, संविधान संवादक, बार्टी मध्ये समतादुत या पदावर कार्यरत असून चमत्कार सादरीकरण, वैज्ञानिक दृष्टिकोण रुजावा यासाठी सहप्रयोग व्याख्यान व त्यांचा अनेक सामजिक कार्याशी जवळचा संबंध आहे. जन्मदिनाच्या औचित्याने दरवर्षी रक्तदान करने, पर्यावरण स्नेही अशा तरुण कार्यकर्त्याची महाराष्ट्र अंनिस राज्य कार्यकारिणीत निवड झाल्याबद्दल जिल्हा अध्यक्ष विजय घाडसे, प्रा. सुरेष वरभे, प्रा. विजय गाडगे, किशोर पारडकर, विनय मिरासे, सचिन पाटील, आकाश लोणारे, निलेश राऊत, ज्योती डब्बावार, प्रल्हाद सिडाम, प्रा. सविता हजारे, नागोराव काकपुरे, अश्विनी वानखड़े, यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.